Tue, Apr 23, 2019 07:22होमपेज › Solapur › मोहोळ : जुगार अड्डयावर छापा; नगराध्यक्ष बारसकरांसह २७ जणांवर गुन्हा दाखल 

मोहोळ : जुगार अड्डयावर छापा; नगराध्यक्ष बारसकरांसह २७ जणांवर गुन्हा दाखल 

Published On: Sep 03 2018 11:22PM | Last Updated: Sep 03 2018 11:22PMमोहोळ : वार्ताहर 

पोलिस अधिक्षकांच्या विशेष पथकाने मोहोळ चे नगराध्यक्ष  रमेश बारसकर यांच्या जागेतील जुगार अड्ड्यावर छापा टाकला. यावेळी पोलिसांनी २६ जुगाऱ्यांसह ०५ लाख २४ हजार ३८१ रुपयांच्या मुद्देमाल ताब्यात घेतला. या प्रकरणी नगराध्यक्ष रमेश बारसकर यांच्यासह २७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. यामुळे मोहोळ तालुक्यातील जुगार विश्वात मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, मोहोळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत जुगार अड्डा सुरु असल्याची गोपनीय तक्रार पोलीस अधिक्षकांकडे आली होती. त्यानुसार पोलीस अधिक्षकांच्या पथकाने ०३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ०४ वाजता मोहोळ शहरातील महिबूब नगर येथे रमेश बारसकर यांच्या जागेत सुरु असलेल्या जुगार अड्डयावर छापा टाकला. यावेळी पोलीसांना सदर ठिकाणी दोन खोल्यांमध्ये काही जुगारी मन्ना नावाचा जुगार खेळत असताना मिळून आले. यावेळी पोलीसांनी त्यांच्याकडून ६८ हजार ६८१ रुपयांच्या रोख रक्कमेसह ११ मोटार सायकल, २४ मोबाईल असा मिळून एकुण ०५ लाख २४ हजार ३८१ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

पोलीसांनी पकडलेल्या जुगाऱ्यांकडे अधिक चौकशी केली असता त्यांची नावे अरुण सदाशिव शिंदे (रा.अनगर ता. मोहोळ), शिवशंकर सदाशिव चव्हाण (रा.कुरणवाडी ता. मोहोळ), प्रेमानंद महादेव मोरे (रा. वाणी गल्ली मोहोळ), योगेश प्रकाश जाधव (रा.कुरुल ता. मोहोळ), मोहम्मद इब्राहिम बागवान (रा.सोमराय नगर मोहोळ), शशिकांत प्रभू सनगर (रा. गवत्या मारुती चौक मोहोळ), संतोष किसन सदरे (रा. देशमुख गल्ली मोहोळ), बालाजी ज्ञानेश्वर जाधव (रा.कुरुल ता. मोहोळ), उमेश दत्तू पारवे (रा. सय्यद वरवडे ता. मोहोळ), नाना लक्ष्मण जाधव (रा.यावली ता. मोहोळ), युवराज अशोक कापुरे (रा. कोळेगाव ता. मोहोळ) बाळासाहेब विठ्ठल गायकवाड (रा.चौमुखी मारुती मोहोळ), सत्यवान जनार्दन कादे (रा.आदर्श चौक मोहोळ), फक्रुद्दीन सरदार मुजावर (रा.दत्तनगर मोहोळ), सुभाष शिवलिंगाप्पा कडगंची (रा. गुलबर्गा), रविंद्र नागनाथ विभुते (रा.भुसार पेठ मोहोळ), हसन कमरुद्दिन तलबदार (रा. महिबूबनगर मोहोळ), इरफान गुलाब बागवान (रा. बागवान चौक मोहोळ), अजित बब्रुवान गायकवाड (रा. गायकवाड वस्ती मोहोळ), अजय तानाजी देशमुख (रा.विद्यानगर मोहोळ), मरगु अंबादास धोत्रे (रा. वडर गल्ली मोहोळ), सुमित तुकाराम पवार (रा.नागनाथ गल्ली मोहोळ) संतोष मारुती धोत्रे (रा. वडरगल्ली मोहोळ), अमोल नरसिंह कुर्डे (रा. नागनाथ गल्ली मोहोळ), सफरुद्दीन अफजल तवक्कल (रा. सिद्धार्थ नगर मोहोळ), मोहन महादेव चोरमले (रा.दत्तनगर मोहोळ) अशी असल्याचे सांगितले. यावेळी पोलिसांनी आरोपींकडे  सदरचा जुगार अड्डा कोणाच्या मालकीचा आहे याबाबत  विचारणा केली असता  त्यांनी  काही एक उत्तर दिले नाही. मात्र पोलीस तपासात सदरचा जुगार अड्डा चालविण्यासाठी मोहोळचे नगराध्यक्ष रमेश नागनाथ बारसकर (रा. गवत्या मारुती चौक मोहोळ) यांनी आपली जागा दिली असल्याचे समोर आले. 

याप्रकरणी मोहोळ पोलिसात नगराध्यक्ष रमेश बारस्कर यांच्यासह वरील २७ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक्षकांच्या टीम मधील पोलीस उप निरीक्षक प्रवीण सिरसट, पोलीस कॉन्स्टेबल तांडूरे, मन्सूर मुल्ला, फुरखान सय्यद, नरेंद्र भोई, हरिदास थोरात, नवनाथ थिटे, लक्ष्मण जाधवर, चालक पो.कॉ. घुले यांनी ही धडाकेबाज कारवाई केली. या गुन्ह्याचा पुढील तपास मोहोळ पोलीस करीत आहेत. मात्र या कारवाईमुळे शहरातील अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.