Sat, Apr 20, 2019 08:22होमपेज › Solapur › नान्नज येथील जुगार अड्ड्यावर छापा; अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

नान्नज येथील जुगार अड्ड्यावर छापा; अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

Published On: Feb 11 2018 12:57AM | Last Updated: Feb 10 2018 8:45PMसोलापूर : प्रतिनिधी

उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज येथील जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा टाकून 7 आरोपींना अटक करुन त्यांच्याकडून रोख रक्‍कमेसह 2 लाख 58 हजार 660 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शुक्रवारी सायंकाळी करण्यात आली.

नान्नज येथील नान्नज ते मार्डी जाणार्‍या रस्त्यावर एका शेतात काही लोक मन्ना जुगार खेळत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्यावरुन गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याठिकाणी छापा टाकला असता गुरव यांच्या शेतातील पडक्या शाळेच्या बाजूला झाडाखाली काही लोक मन्ना नावाचा जुगार खेळताना मिळून आले. यावेळी पोलिसांनी जुगार खेळताना 7 जणांना अटक करुन त्यांच्याकडून 7 मोबाईल, 6 दुचाकी, 24 हजार 160 रुपये रोख असा 2 लाख 58 हजार 660 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक उमेश धुमाळ, हवालदार मल्लिनाथ चडचणकर, संभाजी खरटमल, ख्वाजा मुजावर, प्रेमेंद्र खंडागळे, राऊत, शेंडगे यांनी केली.