Mon, Jul 22, 2019 05:00होमपेज › Solapur › जातीयवादी सरकारला हद्दपार करा : पवार 

जातीयवादी सरकारला हद्दपार करा : पवार 

Published On: Apr 07 2018 11:06PM | Last Updated: Apr 07 2018 9:29PMसोलापूर : प्रतिनिधी  

महाराष्ट्रात  सत्तेत असलेल्या भाजप-शिवसेना या जातीवादी सरकारला हद्दपार करण्यासाठी समविचारी लोकांनी एकत्र आल्याशिवाय सामान्य माणसाला न्याय मिळणार नाही, असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री आ. अजित पवार यांनी केले. 

सोलापुरातील ब्रह्मदेवदादा माने बँकेच्या एसआरपी कॅम्प येथील 21 व्या शाखेचा शुभारंभ शनिवारी अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. सिद्धाराम म्हेत्रे होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष  बळीराम साठे उपस्थित होते.

आ. अजित पवार म्हणाले, हजार कोटी रुपयांची कर्जमाफी केल्याचे मुख्यमंत्री खोटेपण रेटून बोलत आहेत. संस्था नवीन काढण्यापेक्षा आहेत त्या संस्था बुडविण्याचे काम करून सरकार रडीचा डाव खेळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना ज्या विश्‍वासाने जनतेने निवडून दिले, त्या विश्‍वासाला तडा बसला आहे. समाजात एकूणच अस्वस्थता पसरली आहे. पेट्रोल, डिझेल यासह अन्नधान्यांची महागाई आता गगनाला भिडली असून हेच का ‘अच्छे दिन’? म्हणत पवार यांनी भाजप सरकारचा समाचार घेतला.  दरम्यान, ब्रह्मदेवदादा माने बँकेबाबत बोलताना आ. पवार म्हणाले, माजी आमदार ब्रम्हदेवदादा माने यांनी पत नसलेल्या, अडल्या- नडलेल्या आणि गरजू माणसांना मदत करण्यासाठी बँकेची स्थापना केली. दादांनी 26 वर्षांत सात शाखा काढल्या, तर त्यांचे चिरंजीव माजी आमदार दिलीप माने यांनी केवळ 16 वर्षांत 14 शाखा काढून ग्राहकांचा विश्‍वास संपादन केला. केवळ बँकच नव्हे तर साखर कारखाना आणि शैक्षणिक संस्था काढून एक नवा आदर्श ठेवल्याचेही त्यांनी सांगितले.  या कार्यक्रमास बँकेचे अध्यक्ष चंद्रकांत कुलकर्णी, उपाध्यक्ष चंद्रकांत लिंबीतोटे, व्यवस्थापक शरद शिंदे, शाखाधिकारी दिलीप भोगशेट्टी, जयकुमार माने, जयश्री माने, धनंजय भोसले, शिवाजी घोडके-पाटील, सुरेश हसापुरे, प्रवीण देशपांडे, दिलीप कोल्हे, अण्णाराव पाटील, कविता घोडके-पाटील, रामचंद्र केंडे, भारत  जाधव, किसन जाधव, प्रदीप गारटकर, महेश गादेकर, संतोष पवार, मनोहर सपाटे, प्रवीण डोंगरे, राजन जाधव, चेतन नरोटे, नलिनी चंदेले, अलका राठोड, गो. मा. पवार, सुशीला आबुटे, गुरुसिद्ध म्हेत्रे, विनोद भोसले, अप्पू पाटील, नागेश ताकमोगे, राजेंद्र हजारे, जितेंद्र साठे, श्रीशैल नरोळे, बाबा मिस्त्री, शिवलिंग गौडा-पाटील, भोजराज पवार आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ज्योती वाघमारे यांनी केले.