होमपेज › Solapur › कोल्हापूर खंडपीठासाठी आर.पी.आय. मुख्यमंत्र्यांना घेराव घालणार

कोल्हापूर खंडपीठासाठी आर.पी.आय. मुख्यमंत्र्यांना घेराव घालणार

Published On: Jul 19 2018 1:39AM | Last Updated: Jul 18 2018 10:16PMपंढरपूर : प्रतिनिधी

कोल्हापूर खंडपीठाची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित  असून हा प्रश्‍न त्वरित मार्गी लावावा अन्यथा येत्या आषाढी यात्रेमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) च्यावतीने मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्यात येणार असल्याचा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) युवक आघाडीचे प्रदेश संघटन सचिव दीपक चंदनशिवे  यांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे.

बार असोसिएशनच्यावतीने अनेक वेळा आंदोलने करूनही त्याकडे शासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. हा प्रश्‍न त्वरित मार्गी न लावल्यास येणार्‍या आषाढी एकादशी दिवशी (ता. 23 रोजी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेराव घालण्यात येईल याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील असे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्यावतीने तहसीलदार मधुसुदन बर्गे यांना देण्यात आले आहे.

या निवेदनावर युवक आघाडीचे संघटन सचिव दीपक चंदनशिवे, तालुका संपर्क प्रमुख भीमराव शिंदे, विधी सल्लागार अ‍ॅड. महेश कसबे, तालुकाध्यक्ष अर्जुन मागाडे, सरचिटणीस कैलास कांबळे यांच्या सह्या आहेत.