होमपेज › Solapur › सावळेश्‍वर टोलनाक्यावर राष्ट्रवादीचे आंदोलन

सावळेश्‍वर टोलनाक्यावर राष्ट्रवादीचे आंदोलन

Published On: Dec 29 2017 1:31AM | Last Updated: Dec 28 2017 11:48PM

बुकमार्क करा
मोहोळ ः प्रतिनिधी

मोहोळ राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे विविध मागण्यांसाठी सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र. 65 वरील सावळेश्‍वर टोलनाका येथे वसुली बंद आंदोलन करण्यात आले. 

प्रथम गांधीगिरी करीत टोल प्रशासन अधिकार्‍यांना गुलाबाचे फुल देऊन, अपघातात मृत्यू झालेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. महामार्गावरील अपघातात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबाला प्रत्येकी 10 लाख रुपये नुकसानभरपाई मिळावी, टोल कंपनीच्या हलगर्जीपणामुळे 12 जणांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी टोल संचालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, टोलनाक्यावर फक्‍त मोहोळ तालुक्यातील भूमिपुत्रांना नोकरी मिळावी, मोहोळ शहरासाठी स्वतंत्र सर्व्हिस रोड करून द्यावा आदी विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. 

मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करू, असा इशारा यावेळी देण्यात आला. या आंदोलनात मोहोळ नगरपरिषद नगराध्यक्ष रमेश बारसकर, नरखेड जि.प. सदस्य उमेश पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.