Mon, Mar 25, 2019 17:24होमपेज › Solapur › सोलापूर : छिंदमवर गुन्हा दाखल करण्यासाठी ठिय्या आंदोलन (Video)

सोलापूर : छिंदमवर गुन्हा दाखल करण्यासाठी ठिय्या आंदोलन (Video)

Published On: Feb 16 2018 5:53PM | Last Updated: Feb 16 2018 5:53PMसोलापूर : प्रतिनिधी

अहमदनगरचे उपमहापौर छिंदमवर गुन्हा दाखल करण्यासाठी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात सकल मराठा समाजाच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. शिवजयंती अवघ्या तीन दिवसांवर आली असताना भाजपच्या उपमहापौरांनी शिवजयंतीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने वाद निर्माण झाला आहे.

संबंधित बातमी : नगर : उपमहापौरांच्या घरावर तगडफेक; तणाव

नगर : उपमहापौरांचा माफीनामा आणि राजीनामाही

 

मनपा कर्मचार्‍याची खरडपट्टी काढताना उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी कर्मचार्‍याला उद्देशून शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरल्याची ऑडियो क्लिपही सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. दरम्यान, कर्मचार्‍याने युनियनकडेही याबाबत तक्रार केली आहे. त्यानंतर छिंदम यांच्या कार्यालयावर संतप्त जमावाने दगडफेक केली. तसेच तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर छिंदम यांनी माफी मागून उपमापौरपदाचा राजीनामादेखील दिला आहे.

आणखी बातम्या वाचा 

शिवजयंती सण, उत्सव म्हणून साजरी करणार

लातूर : शिवरायांची रांगोळी अडीच एकरात (व्‍हिडिओ)

धनंजय तू बिनधास्‍त बॅटिंग कर रे : अजित पवार