Tue, Apr 23, 2019 19:36होमपेज › Solapur › मोहोळमध्ये राम कदम यांचा महिला राष्ट्रवादीकडून निषेध

मोहोळमध्ये राम कदम यांचा महिला राष्ट्रवादीकडून निषेध

Published On: Sep 06 2018 1:04PM | Last Updated: Sep 06 2018 1:03PMमोहोळ : वार्ताहर

भाजप आमदार राम कदमांनी घाटकोपर येथे महिलांविषयी आक्षेपार्ह विधान केल्याने महिला वर्ग संतप्त झाला आहे. राज्यात ठिकठिकाणी त्यांचा निषेध व्यक्त केला जात आहे.  मोहोळ शहर व तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनेही राम कदम यांच्या फोटोला जोडे मारुन त्या फोटोचे दहन करण्यात आले. 

भाजपचे आमदार राम कदम यांनी घाटकोपर येथे तरुण मुलांना उद्देशुन तुम्हाला कोणती मुलगी पसंत आहे ते सांगा मी तिला पळवून आणतो असे वक्तव्य केले होते. त्यामुळे मोहोळ शहर व तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ही त्यांचा निषेध करण्यात आला. ०५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ०५ वाजता मोहोळ नगरपरिषद कार्यालयासमोर राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या जमा झाल्या होत्या. यावेळी त्यांनी भाजप सरकार आणि आमदार राम कदम यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी संतप्त महिलांनी राम कदम यांच्या पोस्टरला चपला मारुन पोस्टरचे दहन केले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रमेश बारसकर आणि सारिका नाईकनवरे यांनी मनोगत व्यक्त करुन राम कदम यांच्या वक्तव्याचा निषेध केला. यावेळी राष्ट्रवादीच्या महिला तालुकाध्यक्ष तथा पं.स. सदस्या सिंधुताई वाघमारे, शहराध्यक्षा यशोदाताई कांबळे आदी सह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या उपस्थित होते.