Tue, Jul 23, 2019 02:08होमपेज › Solapur › ...तर भागवतांना झेड प्लस कशासाठी? (Video)

...तर भागवतांना झेड प्लस कशासाठी? (Video)

Published On: Feb 14 2018 12:29PM | Last Updated: Feb 14 2018 12:29PMसोलापूर : प्रतिनिधी

मोहन भागवत यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसने आंदोलन केले. या आंदोलनात मोहन भागवत भारत सरकारकडून पुरवण्यात येणारी झेड प्लस सुरक्षा का घेतात? जर त्यांच्या संघाच्या कार्यकर्त्यांमध्ये इतकी क्षमता आहे तर त्यांनांच सोबत घेऊन फिरावे असे कार्यकर्त्यांनी म्हटले. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. तसेच भागवतांनी भारतीय सैन्याची माफी मागावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

बिहार येथील एका कार्यक्रमात बोलताना मोहन भागवत यांनी लष्कराप्रमाणे एक जवान तयार करण्यासाठी संघाला केवळ ३ दिवस पुरेसे आहेत. संविधानाने परवानगी दिल्यास संघाचे कार्यकर्ते  सीमेवर जाऊन देशाचे संरक्षण करतील, असे म्हटले होते.