Thu, Jun 27, 2019 09:50होमपेज › Solapur › दूध दर वाढीसाठी सांगोल्यात रास्ता रोको

दूध दर वाढीसाठी सांगोल्यात रास्ता रोको

Published On: May 08 2018 10:40PM | Last Updated: May 08 2018 8:51PMसांगोला  : वार्ताहर

सरकारने शेतकर्‍यांची चेष्टा लावली असून शेतीमालाला हमी भाव मिळत नाही. दुधाचे दर प्रचंड प्रमाणात कमी झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांचे सरकारला गांभीर्य नाही. म्हणून युवक काँग्रेस व संभाजी ब्रिगेड,रिपइं,मनसे यांच्या संयुक्‍त विद्यमाने दूधदरवाढ व शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांसाठी मंगळवारी कडलास नाका येथे  रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष नानासाो डवरे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष अरविंद केदार, मंगळवेढा युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष नितीन नागणे, पंढरपूर राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष अरुण आसबे, बापूसाहेब ठोकळे, नंदकुमार शिंदे, संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष प्रदीप मिसाळ, तालुका उपाध्यक्ष डॉ.विजय बाबर, शहराध्यक्ष प्रताप इंगोले, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्ता टापरे, शहराध्यक्ष अजयसिंह इंगवले, सोमनाथ शिंदे, मनसेचे तालुकाध्यक्ष सतीश दीडवाघ, पांडुरंग खटकाळे, गणेश कदम, प्रवीण गायकवाड, राहुल गायकवाड, संजय लेंडवे,  शिवप्रसाद गायकवाड, संग्राम गायकवाड, राहुल गायकवाड, ज्ञानू गायकवाड, बापू माने, शामराव गायकवाड, संजय गायकवाड, केशव गायकवाड, प्रशांत मिसाळ, ओमराज मोहिते, अशपाक खलिफा, लकी कांबळे, रवी गंभीरे, सिद्धेश्‍वर काळे,  कृष्णा भजनावळे यांच्यासह युवक काँग्रेस व संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.


यावेळी बापूसाहेब ठोकळे म्हणाले की, शेतकर्‍यांना न्याय मागण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. 2019 च्या निवडणुकीत भाजप सरकारला त्यांची जागा दाखवून दिली जाईल असे त्यांनी सांगितले. यावेळी मंगळवेढा युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नितीन नागणे म्हणाले की, म्हशीच्या दुधाला 60 रु. व गायीच्या दुधाला 40 रु.प्रति लि.दर मिळालाच पाहिजे. पशुखाद्याचे दर भरमसाठ वाढले असून दुधाचे दर कमी झाले आहेत. परिणामी शेतकरी संकटात सापडला आहे. यावेळी दत्ता टापरे, अरविंद केदार, विजय बाबर, नानासाो इवरे, नंदकुमार शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्‍त केले. आंदोलनकर्त्यांनी नायब तहसीलदार बाळासाहेब बागडे व पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांना निवेदन दिले.  दूध दरवाढीच्या संदर्भात रास्ता रोको आंदोलनाला आर.पी.आय. डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्टुडंट असो., भारिप, मनसे यांनी पाठिंबा दिला.