Sun, Aug 25, 2019 04:05होमपेज › Solapur › तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांकडून स्वयंचलित स्वच्छता यंत्रणेची निर्मिती

तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांकडून स्वयंचलित स्वच्छता यंत्रणेची निर्मिती

Published On: Apr 12 2018 1:18AM | Last Updated: Apr 11 2018 9:13PMकरमाळा : तालुका प्रतिनिधी

सोलापुरच्या शासकीय तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांनी दुर्लक्षित असलेल्या सोलर पॅनलच्या अस्वच्छतेवर मात करण्यासाठी एक स्वच्छतेच्या यंत्रणेची निर्मिती केली असून सातत्याने इमारतीच्या छतावर धूळखात पडून कार्यक्षमता कमी झालेल्या पॅनलला आता योग्य क्षमतेने कार्य करता येणार आहे. या यंत्रणेच्या निर्मिती करणार्‍या तरूण विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.

स्वच्छतेचे महत्त्व लक्षात घेता शासकीय तंत्रनिकेतन सोलापूरमधील यंत्र अभियांत्रिकी च्या तृतीय वर्षातील विद्यार्थी शावेज शकुर शेख, समी शेख, नईम मनेर, श्रीनाथ काळे व सादिक शेख यांच्या मनामध्ये स्वयंचलित सौर पॅनल स्वच्छ करणारी यंत्रणा बनवण्याचा विचार आला. कारण दररोज इमारतीवर असणार्‍या सोलर पॅनलवर दररोज खूप धूळ जमा होत असते व त्यामुळे त्याची औष्णिक शोषण (Solar Transmittance) क्षमता कमी होते. सूर्य किरणांचे शोषण कमी झाल्याने त्याचा परिणामही (Power Output)  कमी मिळत असतो, म्हणून याला पर्याय काढण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न या विद्यार्थ्यांनी केला.

प्रा. ए.एस. कप्पिकेरी सरांच्या मार्गदर्शना खाली त्यांनी ही यंत्रणा बनवण्यास सुरुवात केली आणि जिद्द, मेहनतीच्या जोरावर यंत्रणा बनवण्यामध्ये ते यशस्वी झाले. यामध्ये या यंत्रणेचा (डुळींलह) बटण ज्यावेळेस आपण चालू करू त्यावेळेस सौर ऊर्जेचा वापर करून ही यंत्रणा काम करण्यास सुरुवात करते. यासाठी प्रथम पाणी उपसणार्‍या मोटारींच्या सहाय्याने (र्डीलाशीीळलश्रश र्झीाि च्या मदतीने) पाईपद्वारे पाणी फवारले जाईल आणि नंतर दोन्ही बाजूच्या चेन(उहरळप डिीेलज्ञशीं) च्या मदतीने र्इीीीह द्वारे सौर पॅनल स्वयंचलित स्वच्छ होण्यास सुरुवात होते.

सौर पॅनलच्याच एपशीसू चा वापर करुन ही यंत्रणा काम करणार आहे. त्यामुळे वीज बचत होण्यास याचा खूप उपयोग होणार आहे. तसेच मानवाचे काम सोपे होण्यास देखील याची खूप मदत होणार आहे. या यंत्रणेसाठी कप्पिकेरी सर आणि विभागप्रमुख बी.डी. थोरात यांचे मोलाचे मार्गदर्शन त्यांना लाभले आहे. या यंत्रणेमध्ये अजून सुधारणा करून मानवाचे काम सोपे करण्याचा नक्कीच ते प्रयत्न करणार आहेत.दिवसभर सौरऊर्जा पॅनलमध्ये स्टोर होत असते, म्हणून संध्याकाळी एकदा स्विच जछ केला की फक्त 2-3 मिनिटांमध्ये पूर्ण सौर पॅनल स्वच्छ होऊन निघेल.

या यंत्राच्या निर्मितीसाठी प्रा. ए.एस. कप्पिकेरी यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या यशस्वी यंत्र निर्मितीबद्दल शावेज शेख, समी शेख, सादिक शेख, नईम मनेर, श्रीनाथ काळे या विद्यार्थ्यांचे विभागप्रमुख बी. डी. थोरात आणि प्राचार्य डी. ए. कटारे यांनी अभिनंदन केले  आहे. अशी आहे यंत्रणा या 5 बाय 3 फूटच्या सौर पॅनलमध्ये चार झशवशीींरश्र इशरीळपस, एक 0.5 एचपीची 80 आरएमपी असलेली मोटार, एक गिअर बॉक्स, दोन पॉलिश बार, एक सबमर्सिबल पंप, दहा फुटीच्या दोन चेन, चार शॉपकेट आदींचा समावेश आहे.

सौर पॅनलची स्वयंचलित स्वच्छता

सध्या मोठ्या प्रमाणात सौर ऊर्जेचा वापर सुरु आहे. परंतु सौर पॅनलवर नेहमी धूळ, हवेतील धुळीचे कण आणि घाण जमा होत असते. ज्यांच्या घरावर सौर पॅनल आहेत, त्यांना स्वत: वरती जाऊन ते स्वच्छ करावे लागतात आणि मोठ्या इंडस्ट्रिजमध्ये व जेथे मोठे सौर ऊर्जेचे प्रकल्प आहेत, त्याठिकाणी सौर पॅनल स्वच्छतेसाठी कामगार ठेवावे लागतात व त्यामध्येदेखील खूप धोका असतो. तसेच कामगारांचा खर्चही वाढतो, म्हणून ही यंत्रणा बनवण्यात आली आहे.

ज्यामुळे मानवाचे काम सोपे होऊन सौर पॅनलने आपोआप स्वच्छ होतील व सौर पॅनलच्या ऊर्जेचाच वापर करून ही यंत्रणा काम करणार असल्याने विजेची बचत होण्यास देखील खूप मदत होणार आहे. या यंत्रणेचा खर्च 3-4 हजारपर्यंत आहे. एकदा ही यंत्रणा लावण्यात आली की, परत कोणत्याही प्रकारचा खर्च होणार नाही. याचा देखभालीचा खर्च पण खूप कमी आहे. 

 

Tags : Solapur, Solapur news, Government Polytechnic Student, Automatic Cleanliness System, Production,