Fri, Jul 19, 2019 05:03होमपेज › Solapur › सहायक फौजदार दिलीप सवणे यांना राष्ट्रपती पदक जाहीर

सहायक फौजदार दिलीप सवणे यांना राष्ट्रपती पदक जाहीर

Published On: Jan 25 2018 1:00AM | Last Updated: Jan 24 2018 10:43PMजि.प. शाळेतील मुलांची हुशारी पाहून उपाध्यक्ष अचंबित

सोलापूर ः प्रतिनिधी
टॅलेंट हंट स्पर्धा घेण्याचा उद्देश काय, ही स्पर्धा राज्यस्तरीय का घेण्यात येत नाही, धोकादायक शाळा खोल्यांची दुरुस्ती होणार का, प्रयोगशाळा सुरु होणार का, असे एक ना अनेक प्रश्‍न जि.प. प्राथमिक शाळेतील मुलांनी जि.प. उपाध्यक्ष शिवानंद पाटील यांना विचारुन त्यांना अचंबित केले. यावेळी पाटील यांनीही मुलांच्या सर्व प्रश्‍नांना सकारात्मक उत्तरे देत, त्यांचे मनोबल अधिक बळकट केले. 
जि.प. प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या टॅलेंट हंट स्पर्धेतील यशस्वी 57 विद्यार्थ्यांचा संवाद जि.प. पदाधिकारी व प्रशासकीय अधिकार्‍यांसमवेत ठेवण्यात आला होता. 
दुपारच्या सत्रात या मुलांनी उपाध्यक्ष पाटील यांच्या दालनात त्यांची भेट घेऊन त्यांना आपल्या बुध्दीमत्तेची व कौशल्याची झलक दाखवून दिली. प्राथमिक शाळेतील मुलांची प्रश्‍न विचारण्याची पध्दत, कोणताही शिक्षक कांहीही मार्गदर्शन न करतानाही, त्यांच्याकडून थेट करण्यात येणारे प्रश्‍न व शाळेच्या विकासाकरीता काय अपेक्षित आहे, याची मागणी करण्याची मुलांची पध्दत सर्वांनाच भारावून गेली. 
पंढरपूर तालुक्यातील एका मुलाने रोपळे येथील प्रयोगशाळा व वसतिगृह सुरु करण्याची मागणी केली. बार्शी तालुक्यातील भांडेगाव येथील विद्यार्थ्यांने शाळेत ई-लर्निंग सुविधा करण्याची मागणी केली. माळशिरस तालुक्यातील मारकरवाडी येथील मुलाने जि.प.शाळेचे छत गळत असल्याने शाळा दुरुस्त करण्याची मागणी केली.  पंढरपूर तालुक्यातील रोपळे येथील मुलाने प्रयोगशाळा सुरु करण्याची मागणी केली. याशिवाय कांही मुलांनी शाळेत वाचनालय सुरु करण्यात यावे, गावात लाईट असते, पण शाळेत लाईट नसते, त्यामुळे शाळेत सौर ऊर्जावर आधारित वीज देण्यात यावी, अशी मागणी सभापती पाटील यांच्याकडे केली. या सर्व विद्यार्थ्यांची मागणी सभापती पाटील यांनी तातडीने दखल घेत, त्या सोडविण्याचे आदेश संबंधितांना दिले. सौर ऊर्जासाठी निधीची तरतूद करण्यात आली असून तुमच्या दफ्तराचे ओझे कमी करण्यासाठी फायबर कपाट देण्यात येत आहे. तुम्ही फक्त चांगला अभ्यास करुन आपल्या देशाचे, गावचे नाव लौकिक वाढविण्याचा प्रयत्न करा, असे आवाहन पाटील यांनी मुलांना केले. 

सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर ग्रामीण पोलिस दलातील विशेष शाखेत कार्यरत असलेल्या सहायक फौजदार दिलीप बब्रुवान सवणे यांना प्रजासत्ताक  दिनाच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रपती पदक जाहीर झाले.

दिलीप सवणे हे 1983 मध्ये सोलापूर येथे पोलिस शिपाई म्हणून पोलिस दलात रुजू झाले. त्यांनी जेलरोड पोलिस ठाणे, अकलूज पोलिस ठाणे, सोलापूर तालुका पोलिस ठाणे या ठिकाणी सेवा केली असून सध्या  ते  पोलिस अधीक्षक कार्यालयातील विशेष शाखेत कार्यरत आहेत. सवणे यांनी त्यांच्या कारकिर्दीत अकलूज येथे असताना गांजाच्या अनेक केसेस केल्या. तसेच अनेक अट्टल गुन्हेगारांना अटक करून चंदन पकडले. त्यामुळे तत्कालीन अप्पर महासंचालक बारावकर यांच्या हस्ते सवणे यांचा विशेष गौरव करण्यात आला होता. त्याचप्रमाणे सवणे यांचा कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक, सोलापूर पोलिस अधीक्षकांकडून त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबाबत अनेकदा सत्कार करण्यात आला आहे. सवणे यांना त्यांच्या आतापर्यंतच्या कारकीर्दीमध्ये 368 बक्षिसे मिळालेली असून पोलिस महासंचालकांचे पदक सन 2015 मध्ये मिळाले आहे. त्यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाल्याबाबत पोलिस अधीक्षक एस. वीरेश प्रभू, अपर पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते, पोलिस उपअधीक्षक अत्तार यांनी अभिनंदन केले आहे.