Fri, Apr 26, 2019 03:32होमपेज › Solapur › एमआयएम आणि भाजप हे भाऊभाऊ : प्रणिती शिंदे

एमआयएम आणि भाजप हे भाऊभाऊ : प्रणिती शिंदे

Published On: Jan 10 2018 8:58AM | Last Updated: Jan 10 2018 8:58AM

बुकमार्क करा
सोलापूर : प्रतिनिधी

धर्माच्या नावावर राजकारण करणारे सर्वसामान्य जनतेच्या अडचणीच्या वेळी कुठे गडप होतात. तेव्हा त्यांना आठवत नाही का आपले लोक अडचणीत आहेत. फक्‍त निवडणूक आली की हे एमआयएम आणि भाजपवाले धर्माच्या नावाने मते मागायला सर्वात पुढे असतात. हिंदू- मुस्लिम वाद लावून धार्मिक तेढ निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजणारे भाजप आणि एमआयएम पक्ष हे भाऊभाऊ आहेत. या दोघांत धर्म आणि झेंड्याचा रंग वगळला तर फरक काय, असा सवाल आ. प्रणिती शिंदे यांनी केला.

शास्त्रीनगर येथील युवक काँग्रेस शाखेच्या उद्घाटनाप्रसंगी आमदार प्रणिती शिंदे बोलत होत्या. यावेळी माजी शहर अध्यक्ष सुधीर खरटमल, अल्पसंख्याक सेल अध्यक्ष हाजी तौफिक हत्तुरे, सोलापूर शहर युवक अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे, नगरसेवक रियाज हुंडेकरी, नगरसेवक विनोद भोसले, जुबेर कुरेशी, सादिक कुरेशी, इफ्तेकार तुळजापुरे, असिफ तिम्मापुरे, राहुल वर्धा, रफीक चकोले, मुन्ना बेलीफ, सैफन शेख, विवेक कन्ना, संतोष अट्टेलूर, मन्सूर शेख, जिशान सय्यद, फहीम सय्यद, संजय गायकवाड, बबलू बागवान, मुद्दसर इनामदार, मुर्तुज कुरेशी, फ्रिदा कुरेशी,आदी उपस्थित होते.