Thu, Aug 22, 2019 08:39होमपेज › Solapur › अकलूज डाळिंब मार्केटमध्ये विक्रमी आवक; उच्चांकी दर

अकलूज डाळिंब मार्केटमध्ये विक्रमी आवक; उच्चांकी दर

Published On: Jan 17 2018 2:05AM | Last Updated: Jan 16 2018 9:19PM

बुकमार्क करा
अकलूज : तालूका प्रतिनीधी  

अकलूज बाजार समितीने सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील जन्मशताब्दी महोत्सवाचे औचित्य साधून 11 जानेवारी 2018 रोजी खा. विजयसिंह मोहिते-पाटील यांचे हस्ते  डाळिंब मार्केटचा  शुभारंभ केला. पहिल्या दिवशी बाजारमध्ये सुमारे 12 हजार 500 क्रेटस् रुपये डाळिंबाची विक्रमी आवक झाली. या भागातील गणेश, भगवा व आरक्‍ता डाळिंबाचा दर्जा, प्रत व वाण उच्च प्रतिचा असल्याने या डाळिंबास लखौनो, कानपूर, दिल्ली, जयपूर, फरीदाबाद, शिवाण इ. परराज्यातील  खरेदीदार व्यापार्‍यांकडून तसेच अकलूज इंदापूर, सांगोला, फलटण, पंढरपूर, आटपाडी, जत, सोलापूर आदी स्थानिक व्यापार्‍यांकडून मोठ्या प्रमाणावर मागणी असल्याने प्रति किलो दर 30 ते 201 रुपये  या प्रमाणे उच्चांकी दराने डाळिंबाची विक्री झाली.

दि. 16 रोजीचे डाळिंब सौदे बाजारमध्ये 3170 क्रेटस् डाळिंबाची आवक झाली व प्रति किलोस दर  22 ते 85 रु. पर्यंत निघाले. माळशिरस तालुक्यात व आसपासचे परिसरात डाळिंब लागवड क्षेत्र वाढलेले असून  डाळिंब उत्पादक शेतकरी व व्यापारी यांचेकडून अकलूज येथे डाळिंब मार्केट सुरू करणेबाबत वारंवार मागणी  येत होती त्यांचे मागणी प्रमाणे खा.विजयसिंह मोहिते-पाटील यांनी सूचना केल्या व त्यानुसार अकलूज बाजार समितीने डाळिंब मार्केट सुरू केले. यासाठी प्रशस्त सेलहॉल उपलब्ध करून दिलेला असून 28 डाळिंब आडते व्यापार्‍यांना डाळिंब विक्रीसाठी जागा उपलब्ध करून दिली.  डाळिंबाचे पॅकिंग करणेसाठी पॅक हाऊस व आवश्यकत्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत.डाळिंबाचे सौदे आठवड्यातून तीन दिवस  मंगळवार,गुरूवार व रविवार या दिवशी सकाळी ठीक 11.00 वाजता काढले जाणार आहेत.   अशी माहिती सभापती.  मदनसिंह मोहिते-पाटील,  यांनी दिली.  अकलूज येथील  डाळींब मार्केटकडे डाळिंब उत्पादक शेतकरी व व्यापारी यांचा ओढा असल्याचे दिसून येत असून त्यांचेमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचे सचिव राजेंद्र काकडे यांनी सांगितले .