Thu, Mar 21, 2019 23:22
    ब्रेकिंग    होमपेज › Solapur › पोलिस उपनिरीक्षक लाचलुचपतच्या जाळ्यात

पोलिस उपनिरीक्षक लाचलुचपतच्या जाळ्यात

Published On: Jan 12 2018 1:57AM | Last Updated: Jan 11 2018 11:07PM

बुकमार्क करा
अकलूज : वार्ताहर 

चार्जशीट लवकर पाठवून जामिनासाठी मदत केल्याच्या बदल्यात लाचेची मागणी केलेली 50 हजारांची रक्कम स्वीकारताना येथील शहर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र राठोड याला रंगेहात पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे येथील अधिकार्‍यांनी ही कारवाई  केली.

पुण्यातील एका पार्टीविरोधात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात आरोपींना लवकर चार्जशीट पाठवून जामीन मिळण्यास मदत करण्यासाठी या गुन्ह्याच्या तापासाचे काम पाहणारे पो.उ.नि. राजेंद्र राठोड यांनी 50 हजारांची मागणी केली होती. त्यासाठी तगादा लावला होता. या गुन्ह्यातील आरोपी यांनी पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे येथील अधिकार्‍यांनी गुरुवारी अकलूज येथे दुपारी सापळा लावून राजेंद्र राठोड याला तक्रारदाराकडून 50 हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. पुणे येथील लाच लुचपत विभागाचे  डीवायएसपी अशोक शिर्के, पोलिस निरीक्षक अर्चना बोदडे व  यांनी ही कारवाई केली.