होमपेज › Solapur › सोलापूर : डान्सबारवर छापा; ८ बारबालांसह १९ जण ताब्यात 

सोलापूर : डान्सबारवर छापा; ८ बारबालांसह १९ जण ताब्यात 

Published On: Apr 21 2018 1:13PM | Last Updated: Apr 21 2018 1:13PMसोलापूर : प्रतिनिधी 

सोलापूर-पुणे महामार्गावरील शिवाजी नगर जवळील हॉटेल न्यू विनय ऑर्केस्ट्रावर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी अश्लील कृत्य करणाऱ्या ८ बारबालांसह १९ जणांना ताब्यात घेतले . ही कारवाई शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास करण्यात आली. याबाबत फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सोलापूर शहरातील अनेक ऑर्केस्ट्रा बार मध्ये डान्सबार बिनदिक्कतपणे सुरू असल्याबाबत पुढारीमध्ये वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. या वृत्ताची दखल घेत पोलिस आयुक्तालयातील अधिकाऱ्यांनी कारवाई केली. गेल्या काही दिवसांमध्ये शहरातील पुणे महामार्गावरील हॉटेल पॅराडाईज ऑर्केस्ट्रा बार, हॉटेल जय मल्हार ऑर्केस्ट्रा बार आणि आता हॉटेल न्यू विनय ऑर्केस्ट्रा बारवर छापा टाकला गेला. यात अश्लील कृत्य करणाऱ्या बारबालांसह अनेकांना ताब्यात घेऊन कारवाई केली आहे. 

पोलिसांकडून कारवाई होत असतानाही या ऑर्केस्ट्राबार मध्ये डान्सबार सुरू असल्याचे दिसून येत आहे. अशाच प्रकारच्या एका आर्केस्ट्रा बारमध्ये झालेल्या हाणामारी वरून पोलिस निरीक्षकाला ही पोलीस चौकीत धक्काबुक्की करण्याची घटना घडलेली आहे.