Sun, Jan 20, 2019 06:06होमपेज › Solapur › अवैध दारु वाहतूक करणाऱ्यास मोहोळ पोलिसांनी रंगेहात पकडले...

अवैध दारु वाहतूक करणाऱ्यास मोहोळ पोलिसांनी रंगेहात पकडले...

Published On: Sep 07 2018 9:57PM | Last Updated: Sep 07 2018 9:57PMमोहोळ : वार्ताहर

अवैध दारु विक्रीसाठी घेऊन जात असलेल्या दुचाकीस्वाराला मोहोळ पोलिसांनी रंगेहात पकडले. पांडुरंग सुदाम थोरात (रा. देवडी ता. मोहोळ) असे सदर दुचाकीस्वाराचे नाव पोलीसांनी त्याच्या कडून सुमारे ४६ हजार ३७२ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. ०७ सप्टेंबर रोजी सायंकाळी सव्वापाच वाजता मोहोळ पोलिसांनी ही कारवाई केली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, विनापरवाना विक्रीसाठी शासनाने बंदी घातलेल्या दारुचीची वाहतूक छुप्या मार्गाने केली जात असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी ०७ सप्टेंबर रोजी मोहोळ शहरातील कुरुल रस्ता चौक परिसरात पोलीस पथक तैनात केले होते. सायंकाळी सव्वा पाच वाजता एक इसम दुचाकीवर संशयास्पद रित्या चालला होता. यावेळी पोलिसांनी त्यास थांबवून त्याची झडती घेतली. यावेळी सदर मोटर सायकलला पाठीमागे अडकवलेल्या पांढऱ्या पिशवीत अवैध दारु मिळून आली. पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन त्यांच्याकडून दुचाकीसह सुमारे ४६ हजार ३७२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

याप्रकरणी पांडुरंग सुदाम थोरात (रा. देवडी ता. मोहोळ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक फौजदार प्रवीण जाधव हे करीत आहेत.