Sat, Feb 23, 2019 04:00होमपेज › Solapur › आणखी तिघांचा कसून शोध सुरू

आणखी तिघांचा कसून शोध सुरू

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पंढरपूर : प्रतिनिधी

अपक्ष नगरसेवक संदीप पवार यांच्या खुनानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करीत तब्बल 9 संशयितांना अटक करून त्यांची चौकशी सुरू केली आहे. तरीही या खून प्रकरणातील पोलिसांना हव्या असलेल्या आणि खुनाचा सूत्रधार मानल्या जात  असलेल्या आणखी 3 आरोपींचा पोलिस कसून शोध घेत आहेत. येत्या दोन दिवसांत हे संशयितही पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता व्यक्‍त होत आहे. 

संदीप पवार यांची 18 मार्च रोजी येथे गोळ्या घालून आणि कोयत्याने वार करून हत्या केल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली होती.सोलापूर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या तपास पथकांनी सांगली, पंढरपूर येथे छापे टाकून तसेच ठाणे पोलिसांच्या ताब्यातील 4 आरोपींना पंढरपुरात आणलेले आहे.  वास्तविक, संदीप पवार यांचा खून केलेले मारेकरी हे बाहेरचे असल्याची शक्यता व्यक्‍त होत असताना त्यांना मदत करणार्‍या 9 संशयीत आरोपींपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आले आहे. सध्या या संशयितांचा मुक्काम पोलिस कोठडीत असून पोलिस मुख्य आरोपींबाबत त्यांच्याकडून माहिती काढत आहेत. नगरसेवक पवार यांच्या आई नगरसेविका श्रीमती सुरेखा पवार यांनी घटना घडल्याच्या रात्रीच दिलेल्या फिर्यादीमध्ये संदीप अधटराव आणि विकी मोरे या दोघांवरही संशय व्यक्‍त केला होता. त्यानुसार पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र गेल्या 10 दिवसांत हे दोन्ही संशयीत पोलिसांच्या हाती लागले नाहीत. त्यामुळे त्यांच्यासह अन्य एका संशयिताच्या शोधात पोलीस आहेत. हे संशयीत ताब्यात आल्यानंतरच खुनाचे नेमके कारण आणि खरा सूत्रधार उघड होण्याची शक्यता व्यक्‍त होत आहे. 

Tags : Solapur, Solapur News, Police, searching, more 3, accused.


  •