Thu, Jan 30, 2020 00:21होमपेज › Solapur › कोल्हापुरचा हा पोलिस अधिकारी देतोय उपेक्षितांना मायेची ऊब

'वर्दीतील दर्दी देतोय उपेक्षितांना मायेची ऊब'

Published On: Dec 11 2017 1:12PM | Last Updated: Dec 11 2017 1:28PM

बुकमार्क करा

सोलापूर : श्रीकांत साबळे  

सांगली, कोल्हापूर येथील घटनांनंतर पोलिस खात्याची होती नव्हती तेवढी लक्तरे वेशीवर टांगली जात असतानाच याच खाकी वर्दीतील दर्दी म्हणून ओळख असलेला एक अधिकारी उपेक्षित, रस्त्यावरचे जीणे जगणार्‍यांना कपड्यांच्या माध्यमातून मायेची ऊब देऊन आपलेपणाची जाणीव करून देण्यात व्यस्त आहे. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गुन्हेगारीचा अड्डा म्हणून नवी ओळख निर्माण होत असलेल्या नागपुरात हे घडतंय, हेही विशेष.

पी.आर. पाटील लाचलुचपत खात्यात नागपूर विभागाचे पोलिस अधीक्षक म्हणून सध्या कार्यरत असलेले आणि मुळचे कोल्हापूर जिल्ह्यातील सरूड या गावचे रहिवासी असलेला हाच तो खाकी वर्दीतील दर्दी माणूस. 

कडक्याच्या थंडीसाठी प्रसिद्ध असलेल्या नागपूर शहरातील रस्त्यावर तसेच रात्री-अपरात्री काबाडकष्ट करून पोटाची खळगी भरून  रस्त्यावरच मुक्काम करणार्‍यांना हजारो रुपये किंमतीचे याच थंडीपासून बचाव करण्यासाठी ऊबदार कपडे मिळणे दुरापास्तच. अगदी हिच गरज ओळखून पोलिस खात्यात आपल्या चित्रकलेच्या माध्यमातून दर्दी म्हणून ओळख असलेले पी.आर. पाटील यांनी मागील काही दिवसांपासून आपल्या  कर्मचार्‍यांच्या माध्यमातून ऐपतीप्रमाणे जमा झालेल्या रकमेतून रस्त्यावर तसेच रस्त्याकडेला कडकडणार्‍या थंडीतून झोपलेल्या वृध्दांना थंडीपासून बचाव करणारे कपडे उपलब्ध करून देत त्यांना मायेची ओलावा देण्याचा आदर्शवत उपक्रम सुरू केला आहे. 

विशेष म्हणजे याचा त्यांनी प्रसिध्दीच्या हव्यासापोटी कोणताही प्रकारचा दिंडोरा पिटला नाही. 

मागील तीन दिवसांत जवळपास 100 हून अधिक अनाथ, गरजू वृध्दांना त्यांनी ऊबदार कपडे उपलब्ध करून देऊन मायेची ऊब देण्याचा प्रयत्न केला आहे.