Tue, Jun 18, 2019 21:18होमपेज › Solapur › सायकल प्रवासातून ‘झाडे लावा, पाणी वाचवा’ संदेश

सायकल प्रवासातून ‘झाडे लावा, पाणी वाचवा’ संदेश

Published On: May 23 2018 12:10AM | Last Updated: May 22 2018 11:19PMसोलापूर : प्रतिनिधी

‘झाडे लावा, पाणी वाचवा’, ‘मुली वाचवा’ हा दिव्य संदेश देत सोलापूर जिल्हा न्यायालयात कार्यरत असणारे  लिपिक सुनील पवार यांनी सायकलीवर 1051 कि.मी.चा प्रवास केला. सोमवारी रात्री 10 दिवस, 9 रात्रीचा प्रवास सोलापुरात पूर्ण झाला. सोलापूर जिल्हा न्यायालयातील लिपिक सुनील पवार हे ‘मुली वाचवा’, ‘झाडे लावा, पाणी वाचवा’ याचा प्रचार करण्यासाठी  आणि संदेश देण्यासाठी सांगली, कोलापूर, सातारा, पुणे, शिर्डी  आदी  ठिकाणी 1051 कि.मी.चा सायकलीने प्रवास करून सोमवार, 21 मे रोजी सायंकाळी 6 वाजता संभाजीराजे चौक, जुना पुणे नाका, सोलापूर येथे आले. 10 दिवस, 9 रात्री सतत सायकलवर फिरून सामाजिक संदेश दिला. स्वागतावेळी माधव गोटे, ज्ञानेश्‍वर लिंबोळे, रोहित मुळे, इक्बाल पठाण, संजय सुरवसे, गणेश डांगे, ए.एन. जोशी आदी कर्मचारी उपस्थित होते. आमीर खानच्या पाणी फौंडेशन व नाना पाटेकरांची नाम संस्था यांच्या सामाजिक कार्यामुळे प्रेरित होऊन आपणही काही तरी सामाजिक कार्य करुन दिव्य व सामाजिक  संदेश देऊ असा विचार सुनील पवार यांच्या मनात पाच ते सहा महिन्यांपूर्वी  आला.

त्याअनुषंगाने त्यांनी 16 हजार रुपयांची सायकल विकत घेतली. एकत्र कुटुंब पध्दतीमध्ये घर चालवण्याची संपूर्ण जबाबदारी सुनील पवार यांच्यावर होती. घरच्या सर्व समस्या सोडवत त्यांनी समाजासाठी वेळ दिला. आपल्यावर समाजाची जबाबदारी आहे हे भान ठेवून ‘मुली वाचवा’, ‘झाडे लावा, पाणी वाचवा’,  असा संदेश देण्याच्या प्रयत्न सुरु केला. त्यामधून साायकल प्रवास सुरु झाला. 12 मे रोजी पहाटे सुनील पवार यांचा सामाजिक  सायकल प्रवास सुरु झाला. सोलापूरहून सुरु झाल्यानंतर सांगोला येथील न्यायालयीन कर्मचार्‍यांनी त्यांचे स्वागत केले व जेवणाची सोय केली. मुक्काम ज्याठिकाणी असायचा त्या तेथील सामाजिक संस्थांनी त्यांचे स्वागत केले.सांगली, कोल्हापूर, कराड, वाई, सातारा, पुणे, संगमनेर, शिर्डी, अहमदनगर, करमाळा, मोहोळ, सोलापूर असा प्रवास झाला.सोमवारी सायंकाळी 21 मे  रोजी 1051 कि.मी.चा प्रवास  जुना पुणे नाका येथे पूर्ण झाला.