Sun, Jul 21, 2019 07:47होमपेज › Solapur › पटसंख्या 24 अन् उपस्थिती एक

पटसंख्या 24 अन् उपस्थिती एक

Published On: Aug 06 2018 1:56AM | Last Updated: Aug 05 2018 9:23PMसोलापूर : दीपक होमकर

बोगस पटसंख्या दाखवून वर्ग आणि शिक्षक वाचविण्याच्या नादात तांदळाचा अपहारही करावा लागणार्‍या खासगी शाळांच्या यादीत महापालिकेच्याही तब्बल दहा शाळांचा सहभाग आहे. शिवाय ऐन पटपडताळणीच्या दिवशीही एकच विद्यार्थी उपस्थित आणि पटसंख्या मात्र 24 असा अनुपस्थितीचा विक्रमही महापालिकेच्या शाळांनीच नोंदविला आहे.

2011 साली राज्यातील सर्व शाळांची एकादिवशीच पटपडताणी मोहीम घेण्यात आली होती. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील सुमारे 115 शाळांमध्ये बोगस पटसंख्येतील निम्मे विद्यार्थी बोगस आढळले होते. त्यातील शहरातील 62 शाळांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात बोगस विद्यार्थी दाखविणार्‍या शाळांनी शालेय पोषण आहारांतर्गत बोगस विद्यार्थ्यांच्या नावे तांदूळ उचलत अपहार केला असल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने  दिले आहेत. त्या शाळांची यादीही शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून महापालिका शिक्षण मंडळाला पोहोचली आहे. त्यामध्ये पटसंख्येच्या तुलनेत पन्नास टक्केपेक्षा अधिक विद्यार्थी ज्या शाळेत गैरहजर होते अशाच शाळांचा समावेश आहे.

या यादीत महापालिका तेलुगु शाळा क्रमांक 2 ची पटसंख्या 24 दाखविली असून उपस्थिती मात्र केवळ एकच असल्याची नोंद आहे. शिवाय तेलुगु शाळाभाग एकची पटसंख्याही तब्बल 100 दाखवली असून हजर मात्र दहा होते. तेलुगू माध्यमांच्या शाळांबरोबर उर्दू माध्यमांच्या एकेका शाळेने तब्बल शंभर शंभर बोगस विद्यार्थी दाखविले आहेत. त्यामध्ये मनपा उर्दू शाळा क्रमांक तीनची पटसंख्या 145  दाखविली असून उपस्थिती मात्र 58 इतकीच होती.  या सर्व पटसंख्येबाबत आता कोणती कारवाई होणार याकडे लक्ष आहे.