Wed, May 22, 2019 16:36होमपेज › Solapur › मेल, एक्स्प्रेस गाड्यांना वेटिंग सुरू

मेल, एक्स्प्रेस गाड्यांना वेटिंग सुरू

Published On: Apr 24 2018 11:26PM | Last Updated: Apr 24 2018 9:47PMसोलापूर : इरफान शेख

लांबपल्ल्यांच्या गाड्यांचे तिकीट मिळणे अवघड झाले आहे. सुमारे दीड महिन्यांअगोदरच प्रवाशांनी तिकिटे बुक केल्याने अनेक प्रवाशांना वेटिंगवरच प्रवास करावा लागत आहे. उन्हाळी सुट्ट्या असल्याने पॅसेंजर, एक्स्प्रेस व मेल गाड्यांना तुफान गर्दी होत आहे.सिद्धेश्‍वर, सोलापूर-मुंबई एक्स्प्रेसला वेटिंग सुरू झाले आहे. मुंबईला जाणार्‍या लांब पल्ल्यांच्या गाड्यांना आता वेटिंग सुरू झाले आहेे. सोलापूर-मुुंबई एक्स्प्रेस व सिद्धेश्‍वर एक्स्प्रेसला आता किमान आठवड्याभराची तिकिटे बुकिंग करण्यात आले आहेत. दुसरीकडे सोलापूरहून पुण्याला जाणार्‍या हुतात्मा व इंद्रायणी एक्स्प्रेसला मात्र दोन दिवसांचे तिकीटदेखील उपलब्ध दाखवत आहे. सोलापूर स्थानकावरून लांबपल्ल्यांच्या गाड्यांना तोबा गर्दी असून कर्नाटक, राजकोट एक्स्प्रेस आदी गाड्यांना रिग्रेट ही पद्धत अवलंबली जात आहे. 

यंदाच्या रेल्वे बजेटमध्ये एकही नवीन पॅसेंजर, मेल व एक्स्प्रेस गाडी सुरु करण्यात आली नाही. त्यामुळे रेल्वेगाड्यांवर प्रवाशांचा तूफान बोजा निर्माण झाला आहे. लांबपल्ल्याच्या चेन्नई एक्स्प्रेस, नागरकोईल एक्स्प्रेस, उद्यान एक्स्प्रेस, मुंबई-कन्याकुमारी जयंती जनता एक्स्प्रेस, सिकंदराबाद-राजकोट एक्स्प्रेस आदी गाड्यांना तीन महिन्यांपर्यंतचे वेटिंग सुरू आहे. बंगळुुरू-नवी दिल्ली कर्नाटक एक्स्प्रेस व गुजरातला जाणार्‍या गाड्यांना रिग्रेट करण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांना या गाड्यांचे वेटिंग तिकीट मिळणे अवघड झाले आहे.

Tags : Passengers, Booking, Mail Express,Ticket