Sat, Aug 17, 2019 16:22होमपेज › Solapur › नॅरोगेज डिझेल इंजिनच्या कामाबाबत विचारणा : दडस

नॅरोगेज डिझेल इंजिनच्या कामाबाबत विचारणा : दडस

Published On: Mar 21 2018 12:24AM | Last Updated: Mar 21 2018 12:18AMकुर्डुवाडी : प्रतिनिधी

परेल वर्कशॉपमधील नॅरोगेज डिझेल इंजिन तसेच ब्रॉडगेज एलएचबी कोचेसची बोगी तयार करण्याबाबत रेल्वे बोर्डाकडून विचारणा झाली असल्याचे कुर्डुवाडी वर्कशॉपचे प्रबंधक विजयसिंह दडस यांनी सांगितले.  4  हजार 500 कामगारांच्या स्थलांतराबाबत निर्माण झालेला संभ्रम यामुळे दूर झाला आहे. परेल (मुंबई) येथील बंद करण्यात आलेल्या वर्कशॉपमधील 4 हजार 500 कामगार कुर्डुवाडी वर्कशॉपकडे स्थलांतरीत होणार असल्याची माहिती प्रसिध्द झाली होती. या वृत्तामुळे संभ्रमावस्था निर्माण झाली होती.  

याबाबत प्रबंधक विजयसिंह दडस यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, कामगार स्थलांतराचे वृत्त खोटे आहे. त्याबाबत कुर्डुवाडी वर्कशॉप प्रशासनाकडे कोणतीही माहिती नाही. वास्तविक वर्कशॉप बंद करण्याचे अथवा त्याठिकाणचे काम इतरत्र देण्याचे अधिकार रेल्वे बोर्डाला आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे परेल वर्कशॉपकडे साधारण 2200 कामगारांचे मनुष्यबळ आहे. असे असताना साडेचार हजार कामगार आले कोठून ते कळत नाही. पूर्ण परेल वर्कशॉप बंद होणार नाही. या वर्कशॉपमधील नॅरोगेज डिझेल इंजिन तसेच ब्रॉडगेज कोचचा खालील सांगाडा तयार करण्याच्या कामाबाबत कुर्डुवाडी वर्कशॉपला विचारणा झाली आहे. हे काम कुर्डुवाडीतील सध्याच्या 285 मनुष्यबळातच होऊ शकते, असे प्रबंधक दडस यांनी स्पष्ट केले. सध्या वर्कशॉपमध्ये वार्षिक 360 वॅगनचे उद्दिष्ट पूर्ण होत आहे. नॅरोगेज वॅगनचे 22 चे उद्दिष्ट आहे. 18 वॅगन पूर्ण झाल्या आहेत. 47 करोड रुपयांच्या निधीतून विस्तारीकरणाचे काम ‘राईट्स’ कंपनीकडून योग्य पध्दतीने होत असल्याचे त्यांनी सांगितले.
 

 Tags :  Broad Gauge, LHB Coaches,  Parel Workshop Ask To Kurdwadi Workshop Solapur