Mon, Jun 24, 2019 16:35होमपेज › Solapur › पांडुरंग पादुका पालखी सोहळ्याचे 8 मे रोजी श्री क्षेत्र मुक्‍ताईनगरकडे प्रस्थान

पांडुरंग पादुका पालखी सोहळ्याचे 8 मे रोजी श्री क्षेत्र मुक्‍ताईनगरकडे प्रस्थान

Published On: Apr 27 2018 12:44AM | Last Updated: Apr 27 2018 12:25AM पंढरपूर : प्रतिनिधी

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती व श्री संत मुक्‍ताबाई संस्थान यांच्या संयुक्‍त विद्यमाने आयोजित केलेल्या श्री पांडुरंग पादुका पालखी सोहळ्याचे मंगळवार ( दि. 8 मे ) रोजी श्री क्षेत्र मुक्‍ताईनगरकडे प्रस्थान होत आहे. परतीच्या प्रवासात पालखी सोहळ्याचा  श्री क्षेत्र बार्शी येथील भगवंत मंदिरात मुक्‍काम  असल्याची माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे अध्यक्ष डॉ अतुल भोसले यांनी दिली. 

श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र मुक्‍ताईनगर हा परंपरेने सुरु असलेला पालखी सोहळा  श्री संत मुक्‍ताबाई यांच्या अंतर्धान समाधी सोहळ्यासाठी  मंगळवार दि. 8 मे रोजी सकाळी 6 वाजता श्री क्षेत्र मुक्‍ताईनगरकडे प्रस्थान ठेवीत आहे. श्री पांडुरंग पादुकांची सकाळी 6 वाजता श्री क्षेत्र मुक्‍ताईनगरकडे प्रस्थान ठेवेल. मंगळवार दि. 8 रोजी सकाळी 9 वाजता करमाळा, दुपारी 12 अहमदनगर, सायंकाळी 4 वाजता नेवासा फाटा  मार्गे सायकाळी 7 वाजता औरंगाबाद येथील श्री गजानन महाराज मंदिरात मुक्‍कामी पोहोचेल. बुधवार दि . 9 रोजी सकाळी सिल्लोड, दुपारी जामनेर, सायंकाळी कुरापानाचे मार्गे सायंकाळी 5 वाजता श्री विठ्ठल मंदिर, भुसावळ येथे पोहोचेल. गुरुवार दि. 10 रोजी श्री क्षेत्र कोथळी येथे श्री संत मुक्‍ताबाई अंतर्धान समाधी सोहळा असून या सोहळ्यासाठी श्री पांडुरंग पादुका पालखी सोहळा पोहोचेल . शुक्रवार दि . 11 रोजी एकादशी निमित्त श्री क्षेत्र कोथळी ते श्री क्षेत्र मुक्‍ताईनगर दिंडी मिरवणूक होईल. त्यानंतर हा सोहळा श्री क्षेत्र मुक्‍ताईनगर येथे मुक्‍कामी विसावेल.  

शनिवार दि. 12 मे रोजी सकाळी 9 ते दुपारी 12 द्वादश पारणे सोहळा होईल आणि त्यानंतर श्री पांडुरंग पादुका पालखी सोहळ्याचा परतीचा प्रवास सुरू होईल. मलकापूर, मोताळा, बुलढाणा मार्गे हा सोहळा श्री क्षेत्र चिखली येथील श्री रेणुका माता मंदिरात मुक्‍कामी पोहोचेल.  रविवार दि . 13 रोजी देउळगांवराजा, जालना, बीड, अंबड, कुंतलगीरी फाटा मार्गे बार्शी येथील श्री भगवंत मंदिर येथे मुक्‍कामी पोहोचेल. सोमवार दि. 14 रोजी सकाळी 10 कुर्डुवाडी, शेटफळ मार्गे श्री क्षेत्र पंढरपूर येथे पोहोचेल असे डॉ. भोसले यांनी सांगितले. 

यावेळी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, सदस्य आ. रामदास कदम, शकुंतला नडगीरे, दिनेशकुमार कदम , सचिन अधटराव, भास्करगीरी गुरू किसनगीरी बाबा, संभाजी शिंदे, सुरजीतसिंह ठाकूर, ज्ञानेश्‍वर महाराज जळगावकर, डॉ. माधवी निगडे, प्रकाश महाराज जवंजाळ , अतुलशास्त्री भगरे, शिवाजी महाराज मोरे, कार्यकारी अधिकारी सचिन ढोले, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, पालखी सोहळा प्रमुख सूर्यकांत भिसे आदी उपस्थित होते.

Tags : Pandurang Paduka Palkhi Festival, Shri Sector, Muktainagar, Pandhrpur, Solapur