Wed, May 22, 2019 16:41होमपेज › Solapur › आजची पत्रकारिता गतीमान होत आहे : ढोले

आजची पत्रकारिता गतीमान होत आहे : ढोले

Published On: Aug 30 2018 1:32AM | Last Updated: Aug 29 2018 7:49PMपंढरपूर : प्रतिनिधी

समाजातील विविध घटकांना, विषयांना, समस्यांना स्पर्श करून पत्रकार हा समाजाचा आरसा होऊन काम करत आहे असे असताना समाजातील घटकांनी घतलेली भूमिका पत्रकार अत्यंत जबाबदारीने मांडत असताना तारेवरची कसरत करावी लागते.  पत्रकारांना अधिकाधिक सकारात्मक बातम्या तयार करून  प्रसिद्ध करण्याची जबाबदारी वाढली असल्याचे प्रतिपादन पंढरपूरचे प्रांताधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी केले.

स्वेरीमध्ये सोलापूर विद्यापीठ,  आणि श्री. विठ्ठल अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या संयुक्‍त विद्यमाने पत्रकारिता काल, आज आणि उद्या या विषयावर पत्रकारांसाठी आयोजिलेल्या राज्यस्तरीय एकदिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी  उदघाटनप्रसंगी प्रांताधिकारी ढोले बोलत होते. 

यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सागर कवडे, स्वेरीचे सचिव डॉ. बी.पी. रोंगे, पत्रकार निलेश खरे, युवराज मोहिते, रवींद्र आंबेकर, विद्यापीठाच्या वृत्तपत्र विद्या विभागाचे प्रमुख रवींद्र चिंचोळकर, माजी अध्यक्ष धनंजय सालविठ्ठल ज्येेष्ठ विश्‍वस्त दादासाहेब रोंगे आदी उपस्थित होते. 

स्वेरीचे ज्येेष्ठ विश्‍वस्त दादासाहेब रोंगे यांनी प्रास्ताविकात राज्यस्तरीय कायंया आयोजनाचा हेतू सांगितला. डॉ. रवींद्र  चिंचोलकर यांनी पत्रकारांची नेमकी भूमिका, आजची पत्रकारिता आणि यासाठी आवश्यक बदल काय करावे ? याबाबत मत मांडून सुंदर व नेटके आयोजन केल्यामुळे स्वेरीचे कौतुक केले.

पहिल्या सत्रात  वृत्तवाहिन्यांचे महत्त्व आणि मर्यादा या विषयावर पत्रकार निलेश खरे, माध्यमतज्ज्ञ युवराज मोहिते ,रवींद्र आंबेकर यांनी विविध अंगाने पत्रकारितेसंदर्भात विवेचन केले. या  सत्राच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब बडवे होते. 

दुपारच्या सत्रात पत्रकार अभय दिवाणजी, संस्थेचे अध्यक्ष प्रा. सी.बी. नाडगौडा यांनी पत्रकारितेचे महत्त्व किती आहे. हे स्पष्ट केले.  राजन इंदुलकर  यांच्या अध्यक्षतेखाली खुलीचर्चा पार पडली.
  यावेळी कॉलेज कॅम्पसमध्ये मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण देखील करण्यात आले. यावेळी सोलापूर जिल्हा माहिती कार्यालयाचे रवींद्र राऊत, सोलापूर जिल्ह्यासह लगतच्या जिल्ह्यातील प्रिंट मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडियातील साधारणहून अधिक पत्रकार, सोलपूर विद्यापीठातील पत्रकारिता विभागातील विद्यार्थी, विश्‍वस्त बी.डी.रोंगे, स्वेरीचे प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. सूत्रसंचालन उपप्राचार्य प्रा. एस.एन.कुलकर्णी यांनी केले तर कार्यशाळेचे समन्वयक व स्वेरीचे ज्येेष्ठ विश्‍वस्त दादासाहेब रोंगे यांनी आभार मानले.