होमपेज › Solapur › पंढरपुरात 'हम सब एक है' चा नारा (video)

पंढरपुरात 'हम सब एक है' चा नारा (video)

Published On: Aug 07 2018 5:27PM | Last Updated: Aug 07 2018 5:31PMपंढरपूर : प्रतिनिधी

 राज्यभरात मराठा आरक्षण आंदोलन सुरू असतानाच पंढरपुरात मराठा समाजाच्या सुरात धनगर समाजाचाही आवाज मिसळून दोन्ही समाज बांधवांनी 'हम सब एक है' चा नारा दिला. 

पंढरपूर तहसीलसमोर २ ऑगस्ट पासून मराठा समाज आरक्षनाची मागणी करीत ठिय्या आंदोलनास बसला आहे. आज आंदोलनाचा पाचवा वा दिवस आहे. तर आज ( मंगळवारी ) धनगर समाज सुद्धा सोलापूर जिल्ह्यात 'धनगड दाखवा' अशी मागणी करून ठिय्या आंदोलनास बसला आहे. 

याच दरम्यान दोन्ही समाजातील युवक भगवे आणि पिवळे झेंडे घेऊन तहसील कार्यालय गेटसमोर एकत्र आले. एकमेकांना  पिवळा भंडारा, अष्टगंध लावून एकमेकांची गळाभेट घेतली. यावेळी माढा विधानसभेचे आमदार बबन  शिंदे, माजी सभापती वामन माने, जि. प. सदस्या शैला गोडसे,  यांच्यासह  शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.