Wed, Nov 21, 2018 21:26होमपेज › Solapur › पंढरपूरचे कवी रवी सोनार यांची लिम्का बुकमध्ये नोंद

पंढरपूरचे कवी रवी सोनार यांची लिम्का बुकमध्ये नोंद

Published On: Apr 11 2018 1:32AM | Last Updated: Apr 10 2018 8:40PMसोलापूर : प्रतिनिधी

पंढरपूरचे कवी रवि सोनार यांच्या  ‘सखी सोबती, क्षणवैविध्यांची गुंफण’ या शिवप्रज्ञा प्रकाशन काव्यसंग्रहाची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.

द लाँगेस्ट टायटल ऑफ अ बुक अर्थात सर्वात दीर्घ शीर्षक असलेले पुस्तक म्हणून याची नोंद झाली आहे. या काव्यसंग्रहात 2 हजार 57 शब्द असून 6 हजार 76 अक्षरे आहेत.

रवी सोनार यांनी पत्नीला पहायला गेल्यापासून ते लग्नाच्या अठराव्या वाढदिवसापर्यंत झालेल्या घटनांचा आढावा  घेऊन  त्यामध्ये द्विपद, क्षणिका, हायकू, चारोळी, त्रिवेणी अशा पाच काव्यात्मक साहित्य कृतीमध्ये त्यांची गुंफण केली आहे.

कवी रवी सोनार यांच्या काव्यसंग्रहाची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली असल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.


Tags : Limca Book, Pandharpur,  poet Ravi Sonar