Thu, Mar 21, 2019 15:26होमपेज › Solapur › गादेगाव ते बाजीराव विहीर रस्त्यावर खड्डे

गादेगाव ते बाजीराव विहीर रस्त्यावर खड्डे

Published On: Dec 23 2017 2:14AM | Last Updated: Dec 22 2017 11:07PM

बुकमार्क करा

पंढरपूर : प्रतिनिधी

राज्य शासनाने 15 डिसेंबरपर्यंत खड्डेमुक्त महाराष्ट्र केलेल्या घोषणाचा पंढरपूर तालूक्यात मात्र फज्जा उडला आहे. राज्याचे बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या निर्धाराला मात्र  पंढरपूर तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग व जि. प. बांधकाम विभागाने खोडा घातल्याचे चित्र दिसून येते. तालुक्यात खर्डी, गादेगाव परिसरातील रस्ता कोर्टी ते गादेगांव व गादेगांव ते बाजीराव विहीर रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले नाहीत. या रस्त्यावर खड्डे इतके आहेत की हा रस्ता नेमका खड्ड्यात आहे का? खड्ड्यात रस्ता आहे. हे समजत  नाही. गेली 10 ते 15 वर्षापासून गादेगांव ते बाजीराव विहीर हा रस्ता दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. मात्र प्रशासनाकडून याबाबत कसलीही दखल घेतली जात नाही.

या मार्गे सध्या मोठ्या प्रमाणात ऊस वाहतूक होत असून यामुळे रस्त्याला मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.या मार्गावर अपघाता घडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.प्रशासनाने वाहनधारकांचा अंत न पाहता रस्ता दुरुस्तीचे कांम लवकरात लवकर हाती घेणे गरजेचे आहे. आषाढी यात्रेवेळी हा मार्ग प्रमुख मार्ग म्हणून वापरला जातो. यात्रेपूर्वी माती टाकून खड्डे बुजवले जातात. बरड वस्ती येथील चढावर मोठ मोठे खड्डे पडले असून यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.

 याबाबत वारंवार पाठपुरावा करून ही याकडे जाणीवपूर्वक दूर्लक्ष केले जात आहे. यामुळे गादेगांवातील लोकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत आहे. या मार्गावरील गादेगांव ते बाजीराव विहीर ओढा, छोटे छोटे नाले रुंदीकरण करून घ्यावेत. प्रशासनाने या मार्गाच्या दुरुस्तीचे काम त्वरित हाती घेवून ग्रामस्थांना होणार्‍या त्रासातून मुक्त करावे. अशी मागणी होत आहे.