Tue, Jul 23, 2019 06:32होमपेज › Solapur › राष्ट्रवादी बळकट करण्यासाठी एकजुटीने काम करा

राष्ट्रवादी बळकट करण्यासाठी एकजुटीने काम करा

Published On: Dec 07 2017 1:30AM | Last Updated: Dec 06 2017 8:57PM

बुकमार्क करा

पंढरपूर : प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षांची पूर्तता करू शकतो.कष्टकरी शेतकर्‍यांना न्याय देऊ शकतो. याची पुन्हा एकदा जाणीव राज्यातील सत्तांतरानंतर जनतेला झाली असून राष्ट्रवादी काँग्रेस शिवाय पर्याय नाही. अशी भावना जनतेमध्ये वाढीस लागली आहे. अशा वेळी कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकार्‍यांनी समन्वय राखून एकजुटीने काम करणे गरजेचे आहे .असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे खा. विजयसिंह मोहिते-पाटील यांनी केले आहे. 

पंढरपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजीत केलेल्या कार्यकर्ता मेळाव्या प्रसंगी ते बोलत होते. या मेळाव्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे-पाटील, प्रांतिक सदस्य राजूबापू पाटील, आप्पासाहेब जाधव, विद्यार्थी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष संकेत ढवळे, जिल्हा सचिव लतीफ तांबोळी, जिल्हा उपाध्यक्ष युवराज पाटील, जिल्हा सरचिटणिस दिगंबर सुडके, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मंदाताई काळे, ओबीसी सेलच्या जिल्हाध्यक्षा साधना राऊत, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष विलास चेळेकर, किसान सभा अध्यक्ष मारुती जाधव आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे पाटील म्हणाले की,पंढरपूर शहर व तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची नव्या जोमाने बांधणी होत असून कार्यकर्त्यांचा विशेषत: युवकांचा ओढा यापक्षाकडे वाढला आहे. 

जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांबरोबरच नव्याने पक्षात आलेल्या कार्यकर्त्यांनाही सोबत घेऊन काम केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा निवडणुकीत या तालुक्यातील चारही मतदार संघातून आपला आमदार विधानसभेत पाठवेल असा विश्वास व्यक्‍त केला. नूतन पदाधिकार्‍यांच्या निवडींचे पत्र खा.विजयसिंह मोहीते-पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. 
या मेळाव्यास राष्ष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुधीर भोसले, तालुकाध्यक्ष अ‍ॅड.दिपक पवार, पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष दिपक वाडदेकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष गुरुराज अभंगराव, किसान सभेचे तालुका अध्यक्ष कृष्णा माळी, अल्पसंख्याक विभाग तालुकाध्यक्ष गुलाब मुलाणी, डॉक्टर्स सेलचे अध्यक्ष डॉ.पंकज गायकवाड, वकील सेलचे अध्यक्ष प्रशांत उंडाळे, ओबीसी सेल अध्यक्ष अनिल सप्ताळ, ज्येष्ठ नागरिक अध्यक्ष आण्णासाहेब पवार, तालुकाध्यक्ष महादेव पाटील, राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष संदीप मांडवे, राष्ट्रवादी शहर कार्याध्यक्ष संदीप गाजरे, सेवादलाचे जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप भोसले, शहराध्यक्ष प्रकाश मोरे, तालुकाध्यक्ष सुभाष बागल,अल्पसंख्याक विभाग शहराध्यक्ष  रशीद शेख, सलीम मुलाणी, जि.प.सदस्य अतूल खरात, महिला राष्ट्रवादी शहराध्यक्ष रंजना हजारे, तालुकाध्यक्ष अनिता पवार, युवती राष्ट्रवादी काँगे्रसच्या अध्यक्षा चारुशीला कुलकर्णी, ओबीसी जिल्हा कार्याध्यक्ष सुधामती माळी, जयश्री माडगूळकर, मनिषा शिंदे, वैशाली पाटील, संगीता पाटील आदी उपस्थित होते.