Wed, Feb 20, 2019 01:11होमपेज › Solapur › दूध उत्पादक संघांची चौकशी करून कारवाई करू : ना. जानकर

दूध उत्पादक संघांची चौकशी करून कारवाई करू : ना. जानकर

Published On: Dec 23 2017 2:14AM | Last Updated: Dec 22 2017 11:37PM

बुकमार्क करा

पंढरपूर : प्रतिनिधी

राज्यातील दूध उत्पादक संघांकडून करण्यात आलेल्या निपटारा चार्जेसच्या नावाखाली शेतकर्‍यांची आर्थिक फसवणूक झाल्याचे मान्य करून दोषी दूध उत्पादक संघांची चौकशी करून दोषींवर कायदेशीर तरतुदीनुसार कारवाई करण्याचे आश्‍वासन दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी विधानसभेत दिली. राज्यातील दूध उत्पादक संघांनी निपटारा चार्जेसच्या नावाखाली शेतकर्‍यांची कशी फसवणूक केली. राज्यातील दूध उत्पादक संघांनी निपटारा चार्जेसच्या नावाखाली शासनाने ठरवून दिलेल्यापेक्षा कमी दर दिलेला आहे. यासंदर्भात आ. भारत भालके यांनी सभागृहात प्रश्‍न उपस्थित केला होता. दूध उत्पादक गरीब शेतकर्‍याच्या प्रकरणाला आ.  भारत भालके यांनी विधिमंडळ सभागृहात सरकारला चांगलेच धारेवर धरले.

या प्रश्‍नावर ना. जानकर यांनी राज्यातील दूध उत्पादक संघांच्या वतीने आकारण्यात आलेल्या निपटारा चार्जेसच्या नावाखाली घोटाळा व शेतकर्‍यांची आर्थिक फसवणूक झाल्याचे मान्य करून यामध्ये दूध उत्पादक संघ दोषी असून त्यांचेवर कायदेशीर तरतुदींनुसार कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले. तसेच सोलापूर जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकर्‍यांना निपटारा चार्जेस (कपात करणेत आलेले पैसे) त्वरित देण्यासंदर्भात आदेश देण्यात येईल, असे आश्‍वासन दिले.