Mon, Mar 25, 2019 02:55
    ब्रेकिंग    होमपेज › Solapur › पंढरपूर तालुका पंचायत समितीचे सभापती दिनकर नाईकनवरे यांचा राजीनामा

पंढरपूर तालुका पंचायत समितीचे सभापती दिनकर नाईकनवरे यांचा राजीनामा

Published On: Jun 12 2018 12:54AM | Last Updated: Jun 12 2018 12:01AMपंढरपूर : प्रतिनिधी

पंढरपूर तालुका पंचायत समितीचे सभापती दिनकर नाईकनवरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा सोमवारी दिला असून लवकरच नूतन सभापतींची निवड होणार आहे. दरम्यान नुतन सभापती कोण होणार याचा निर्णय सत्ताधारी आघाडीचे मार्गदर्शक आ. प्रशांत परिचारक हेच ठरवणार असल्यामुळे त्यांच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे. 

पंढरपूर तालुका पंचायत समितीच्या फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या निवडणूकीत आ. प्रशांत परिचारक यांच्या नेतृत्वाखालील पंढरपूर, मंगळवेढा विकास आघाडी आणि भारतीय जनता पक्षाचे पुर्ण वर्चस्व निर्माण झाले आहे. सभापतीपद सर्वसाधारण पुरूषाकरिता खुले असल्यामुळे पहिल्या सव्वा वर्षाकरिता  पिराची कुरोली गणातील दिनकर नाईकनवरे यांना सभापतीपदाची संधी देण्यात आली होती.

उपसभापतीपदी ल.टाकळी गणातील अरूण घोलप यांची निवड करण्यात आली आहे. दिनकर नाईकनवरे यांचा सव्वा वर्षाचा कार्यकाल नुकताच संपल्यामुळे ठरल्यानुसार नाईकनवरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे यांच्यांकडे  सोमवारी दिला आहे. यावेळी नाईकनवरे यांच्यासोबत पं.स.सदस्य राजेंद्र पाटील, पांडूरंगचे संचालक तानाजी वाघमोडे आदी उपस्थित होते.

त्यामुळे लवकरच नुतन सभापतीपदाची निवड केली जाणार आहे. नुतन सभापती कोण असणार याचा निर्णयाधिकारी आ. प्रशांत परिचारक यांच्याकडे असल्यामुळे ते कोणता निर्णय घेतात, कुणाला पसंती देतात याकडे आता तालुक्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.