Wed, Apr 24, 2019 16:33होमपेज › Solapur › पंढरपूर : नगरसेवकाची गोळ्या घालून हत्या

पंढरपूर : नगरसेवकाची गोळ्या घालून हत्या

Published On: Mar 18 2018 5:07PM | Last Updated: Mar 18 2018 5:12PMपंढरपूर (सोलापूर): प्रतिनिधी

पंढरपूर नगरपालितील अपक्ष नगरसेवक संदीप पवार यांचा सोलापूर येथे उपचार सुरू असताना मृत्यू झाला. शहरातील मध्यवर्ती असलेल्या स्टेशन रोडवरील श्रीराम हॉटेलमध्ये अज्ञात 6 ते 8 युवकांनी पवार यांच्यावर गोळ्या घातल्या होत्या.

आज दुपारी एकच्या सुमारास पवार हे नियमितपणे स्टेशन रोडवरील श्रीराम हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी गेले असता, तेथे आलेल्या 6 ते 8 युवकांनी पवार यांच्यावर गोळ्या झाडल्या. यात पवार गंभीर जखमी झाले होते. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पवार यांना पोलिस व्हॅनमधूनच खाजगी रुग्णालयात हलविले होते.

या ठिकाणी प्रथमोचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी सोलापूरला हलवण्यात आले होते. डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. या घटनेनंतर शहरात तणावपूर्ण स्थिती असून, सर्व व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आली आहे. घटनेनंतर जिल्हा पोलिस अधीक्षक  विरेश प्रभू, अप्पर पोलिस अधीक्षक निखील पिंगळे यांच्यासह पोलिस अधिकार्‍यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. 

दरम्यान, या घटनेत 6 ते 7 आरोपी असावेत अशी शंका जिल्हा पोलिस प्रमुख प्रभू यांनी व्यक्त केली. आरोपींच्या तपासाकरीता 3 पथके रवाना करण्यात आली आहेत. घटनास्थळावरून 5 गोळ्या सापडल्या आहेत. तसेच जवळच एक कोयता ही आढळून आला आहे. सिसिटीव्ही फुटेज तपासून आरोपींची ओळख पटवण्यात येत असल्याचेही प्रभू यांनी संगीतले.

Tags : Dead, Pandharpur, Corporator Sandeep Pawar, Pandharpur Nagarpalika