Fri, Mar 22, 2019 01:31
    ब्रेकिंग    होमपेज › Solapur › पंढरपूर : संदीप पवार हत्या प्रकरणी ४ आरोपींना अटक

पंढरपूर : संदीप पवार हत्या प्रकरणी ४ आरोपींना अटक

Published On: Mar 19 2018 9:06PM | Last Updated: Mar 19 2018 9:29PMपंढरपूर : प्रतिनिधी

पंढरपूर चे नगरसेवक संदीप पवार यांच्या खून प्रकरणी  ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाने 4 आरोपींना पकडले आहे. ठाण्याच्या  खंडणी विरोधी पथकाचे प्रमुख प्रदीप शर्मा यांच्या पथकाने ही कामगिरी केली असून या सोमवारी संध्याकाळी  गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार अक्षय उर्फ बबलू सुरवसे सह 4 जण ताब्यात घेतले गेले आहेत. 

 पकडण्यात आलेल्या चौघांकडून शस्रसाठा जप्तकरण्यात आला आहे. गुन्ह्यात वापरलेली 2 पिस्तुलही आरोपींकडून जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणी अटक केलेल्या आरोपींची नावे अक्षय उर्फ बबलू सुरवसे (हा सांगलीचा आहे आणि या हत्या प्रकरणाचा सूत्रधार आहे) पुंडलिक वनारे, मनोज शिर्सेकर, भक्तराज धुमाळ यांना अटक करण्यात आली आहे. हे तिघेही पंढरपूरचे रहिवासी आहेत.

 

Tage : solapur, pandharpur , pandharpur news, crime, murder, Pandharpur Municipality Corporator, Sandeep Pawar, murder case, 4 arrested, thane police extortion department