Thu, Mar 21, 2019 11:21होमपेज › Solapur › पंढरपूर : संदीप पवार यांच्या अंत्य यात्रेस सुरुवात(व्हिडिओ)

पंढरपूर : संदीप पवार यांच्या अंत्य यात्रेस सुरुवात(व्हिडिओ)

Published On: Mar 19 2018 10:42AM | Last Updated: Mar 19 2018 10:46AMपंढरपूर (सोलापूर): प्रतिनिधी

अपक्ष नगरसेवक संदीप पवार यांच्या अंत्य यात्रेस सुरुवात झाली आहे. अंत्‍य यात्रेत हजारो समर्थक सहभागी झाले आहेत. संपूर्ण शहरात तणावाचे वातावरण असून बहुतांश शाळा, महाविद्यालये सुद्धा बंद आहेत. दरम्यान आरोपींना अटक करण्याची मागणी करत पवार यांचे पार्थिव छत्रपती शिवाजी चौकात ठेवून ठिय्या आंदोलन करण्यात आले.

पोलिसांनी कारवाईची ग्वाही दिल्यानंतर अंत्य यात्रा पुढे मार्गस्थ झाली. अंत्य यात्रेत पाच हजारापेक्षा जास्त लोक सहभागी झाले आहेत. शहरात सर्वत्र पोलिस बंदोबस्त असून, तणावपूर्ण शांतता कायम आहे. दरम्यान संदीप पवार यांच्या आईने शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. त्‍यांनी पवार यांची हत्‍या करणाऱ्या तीन सांशीयितांची नावे सांगितली आहेत. 

वाचा : नगरसेवक संदीप पवार यांची गोळ्या घालून हत्या

काल (दि. १८ मार्च) दुपारी श्रीराम हॉटेलमध्ये पवार यांच्यावर अज्ञात पाच ते सहा युवकांनी गोळ्या झाडल्‍या होत्‍या. घटनेनंतर त्‍यांना तात्‍काळ पंढरपूर येथील रूग्‍णालयात दाखल करण्यात आले. पंढरपूर येथे प्राथमिक उपचारानंतर त्‍यांना सोलापूर येथील रूग्‍णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरु असतानाच त्‍यांचा मृत्‍यू झाला. 

Tags : Pandharpur, Municipality Corporator, Sandeep Pawar, funeral procession