Sun, Nov 18, 2018 13:38होमपेज › Solapur › पंढरपूर : ह. भ. प. आजरेकर महाराज यांचे निधन

पंढरपूर : ह. भ. प. आजरेकर महाराज यांचे निधन

Published On: Jan 29 2018 11:32AM | Last Updated: Jan 29 2018 11:32AMपंढरपूर : प्रतिनिधी

वारकरी संप्रदायातील मोठे महात्म्य असलेले आजरेकर फडाचे प्रमुख ह. भ. प. श्रीगुरु तुकाराम एकनाथ काळे (आजरेकर माऊली)­ यांचे  रविवारी रात्री  ११.३० वाजता निधन झाले. श्री गुरु तुकाराम काळे महाराज, आजरेकर माऊली श्री क्षेत्र पंढरपूर येथील श्री गुरु बाबासाहेब आजरेकर फडाचे ते फड प्रमुख होते. 

रविवारी रात्री ११:३० वाजता एकादशीचे किर्तन संपल्यानंतर बसल्‍या जागेवर त्यांचे निधन झाले. ते आजरेकर फडावरील ८ वे गुरु होते. आजरेकर फडाची परंपरा व अनुयायी महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात व कोकण भागात मोठ्या प्रमाणात आहेत. आजरेकर फडाच्या गादीवर येऊन त्यांना ३० वर्षे पुर्ण झाली होती. आजरेकर फड हा विद्या वंशज फड म्हणुन प्रसिद्ध आहे. १९६१ साला पासून त्यांची नित्य महिना वारी होती. तसेच आजरेकर फडाला आळंदी, पंढरपूर श्री ज्ञानेश्वरी पालखी सोहळ्यात मानाचे स्थान आहे, तसेच पालखी समोर ४ किर्तन सेवा आहे.