Mon, Apr 22, 2019 11:39होमपेज › Solapur › अपघातात एक ठार

अपघातात एक ठार

Published On: Jul 26 2018 1:40AM | Last Updated: Jul 25 2018 10:09PMनळदुर्ग : प्रतिनिधी 

सोलापूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर इटकळ, ता. तुळजापूर शिवारात अज्ञात भरधाव वाहनाच्या धडकेत मोटारसायकलवरील एक जण जागीच ठार, तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवार, 25 जुलै रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. अपघातील मृत व जखमी हे नळदुर्ग येथील रहिवासी आहेत. सोमनाथ देविदास भूमकर (वय 36, रा. नळदुर्ग) असे अपघातात मृत झालेल्या युवकाचे नाव आहे, तर सचिन नागनाथ भूमकर (वय 40, रा. नळदुर्ग) असे गंभीर जखमीचे नाव आहे. यातील दोन्ही युवक मोटारसायकलवरून सोलापूरहून नळदुर्गकडे येत असताना इटकळ येथील 

भैरवनाथ पोल्ट्रीजवळ महामार्गावरील खड्डे चुकवताना अज्ञात वाहनाने जोराची धडक देऊन झालेल्या अपघातात नळदुर्ग येथील सोमनाथ भूमकर हा जागीच ठार झाला. गंभीर जखमी झालेल्या सचिन भूमकर यास पुढील उपचारासाठी सोलापूर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना समजताच नळदुर्गहून नगरसेवक विनायक अहंकारी यांच्यासह मित्रपरिवारांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले.