होमपेज › Solapur › पंतप्रधानांच्या हत्येच्या कटाच्या संशयातून सोलापुरातून एकास अटक

पंतप्रधानांच्या हत्येच्या कटाच्या संशयातून सोलापुरातून एकास अटक

Published On: Jun 24 2018 11:11PM | Last Updated: Jun 24 2018 11:11PMसोलापूर : प्रतिनिधी

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येच्या कटातील एका संशियतास सोलापुरातून दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. यामुळे खळबळ माजली आहे. 

भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शंकरराव वाघमारे यांनी फेसबुकवर पोस्ट केलेल्या मजकूरामुळे एकच खळबळ उडाली होती. याबाबत भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शंकरराव वाघमारे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कटातील एक जण सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी परिसरातील एका गावात राहत असल्याची माहितीवरून दिल्ली पोलिसांनी एकास अटक केल्याचे सांगितले.    

बापू कुबेर राजगुरू (वय २५ ) असे आहे ताब्यात घेतलेल्या संशियत व्यक्तीचे नाव आहे. तो मोहोळ तालुक्यातील येवती येथला असून सध्या टेंभुर्णी येथील अकोले खुर्द येथील विनोद पाटील यांच्या शेतात कामाला होता. तेथून पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी दिल्लीहून पाच जणांची टीम सोलापुरात दाखल झाली होती. 

ताब्यात घेतलेल्या राजगुरुचा यात जादा रोल दिसून येत नाही. पण त्याचे फेसबुक अंकाऊट हॕक करुन कोणीतरी मिसयूज करीत होते. त्या संशयातून दिल्ली पोलिसांनी त्याला चौकशीकरिता ताब्यात घेतले असल्याचे पोलिस अधीक्षक विरेश प्रभू यांनी सांगितले.