Fri, May 24, 2019 09:29होमपेज › Solapur › अल्पवयीन मुलीच्या अपहरण व अत्याचारप्रकरणी एकाला अटक

अल्पवयीन मुलीच्या अपहरण व अत्याचारप्रकरणी एकाला अटक

Published On: Jan 07 2018 2:04AM | Last Updated: Jan 06 2018 11:32PM

बुकमार्क करा
करमाळा : तालुका प्रतिनिधी

अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेऊन अत्याचार केल्याप्रकरणी करमाळा  पोलिसांनी संशयित आरोपीला  पकडले असून त्याला न्यायालयापुढे उभे केले असता न्यायालयाने 9 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे. अक्षय गोरख लकडे (वय 20, रा. पांडे, ता. करमाळा) असे पोलिस कोठडी ठोठावलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. दरम्यान, पोलिस गंभीरपणे अपहरणाचा तपास करत नसल्याने पीडित मुलीचे आई-वडील 4 जानेवारी 18 पासून करमाळा पोलिस स्टेशनसमोर आमरण उपोषणाला बसले होते.

पांडे तालुका करमाळा येथून  14 वर्षीय अल्पवयीन मुलीस गावातील अक्षय गोरख लकडे (वय 20, रा. पांडे) या प्रवासी वाहतूक करणार्‍या जीपचालकाने 1 डिसेंबर 17 रोजी सकाळी 11 वा. गावातील मुजावर यांच्या मोटारसायकलवरून पळवून नेले होते. पीडित मुलीचे आई-वडील शेतात शेळ्या चारायला, तर भाऊ मजुरीसाठी गेले होते. पीडित ही लहान भावासह गावात आली होती.ही संधी साधून संशयिताने गावातील मुजावर याच्याकडे जाऊन त्यांना शेतात जायचे असे खोटे सांगून मोटारसायकल घेतली व  पीडित मुलीला त्यावर बसवून पळवून नेले.

याबाबत मुलीची आईने पोलिसांत फिर्याद दिली असताना पोलिस  आरोपीचे नाव माहित असतानाही गाभींर्याने तपास करत नव्हते. मुलीच्या जीवाला संशयित आरोपीकडून धोका असताना गुन्हा घडून महिना उलटला तरी पोलिस तपास करीत नाहीत. मुलीचा तपास लवकर व्हावा तसेच निष्क्रिय तपास अधिकारी राजेश देवरे यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी दलित स्वयंसेवक संघाचे जिल्हा अध्यक्ष चव्हाण व माढा तालुका अध्यक्ष लक्ष्मण अस्वरे यांनी पोलिस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली होती. यानंतर पोलिसांनी अधिक तपासाला गती देऊन पीडित मुलीसह संशयित आरोपीला जेरबंद करून त्याच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला.  पोलिस निरीक्षक राजेश देवरे, सचिन आतकर पुढील तपास करीत आहेत.