Thu, Apr 25, 2019 07:27होमपेज › Solapur › सुरेंद्र कर्णिकचा जामीन फेटाळला

सुरेंद्र कर्णिकचा जामीन फेटाळला

Published On: Dec 16 2017 1:50AM | Last Updated: Dec 16 2017 1:50AM

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

जुनी मिल जागा फसवणूक प्रकरणात उमा सहकारी गृहनिर्माण संस्थेची जागा विकसित करणारे के. के. बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे भागीदार सुरेंद्र शशिकांत कर्णिक (वय ५०, रा. मुंबई) यांनी दुसर्‍यांदा दाखल केलेला जामीनअर्ज  अतिरिक्‍त  सत्र  न्यायाधीश एम. व्ही. मोराळे यांनी फेटाळून लावला.

कुमार करजगी यांनी सुरेंद्र कर्णिकच्या मदतीने के. के. बिल्डर्स अँड डेव्हलपर्स ही फर्म भागीदारीत सुरू केली. त्यासाठी कुमार करजगी यांनी प्लॉटधारकांना के. के. बिल्डर्सकडून घर बांधून घेण्याची सक्‍ती केली तसेच प्रत्येक प्लॉटधारकाला डेव्हलपमेंट चार्जेस म्हणून 25 हजार रुपये भरण्यास सांगितले. त्याप्रमाणे प्रत्येक प्लॉटधारकाने कर्णिककडे प्रत्येकी 25 हजार रुपयांप्रमाणे भरले. उमा गृहनिर्माण संस्थेने के. के. बिल्डर्सबरोबर करारपत्र करून त्यांनी जागा विकसित करून प्लॉटचे वाटप करण्याचे ठरले होते; परंतु करजगी व कर्णिक यांनी वेगवेगळी कारणे सांगून प्लॉट ताब्यात देण्याचे टाळले, अशी फिर्याद फौजदार चावडी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी कर्णिकला अटक केली आहे. कर्णिकने जामीन मिळण्यासाठी न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता.त्यावर सुनावणी अतिरिक्‍त सत्र न्यायाधीश मोराळे यांच्यासमोर झाली. सरकारी वकिलांचा युक्‍तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने कर्णिकचा जामीन अर्ज फेटाळला. याप्रकरणी सरकारच्या वतीने अ‍ॅड. संतोष न्हावकर, मूळ फिर्यादीच्या वतीने अ‍ॅड. धनंजय माने, अ‍ॅड. जयदीप माने यांनी, तर आरोपीच्या वतीने अ‍ॅड. राज पाटील यांनी काम पाहिले.