Sat, Jul 20, 2019 23:22होमपेज › Solapur › जमिनीच्या वादातून वृद्धाचा खून

जमिनीच्या वादातून वृद्धाचा खून

Published On: Apr 24 2018 1:07AM | Last Updated: Apr 23 2018 10:28PMअक्कलकोट : वार्ताहर

शेती व घराच्या मालकी हक्कावरून घरावर दगडफेक करून लाथाबुक्क्याने केलेल्या मारहाणीत वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना अक्कलकोट येथे घडली आहे. आप्पासो पिरप्पा हरवाळकर (वय 70) असे मारहाणीत मृत्युमुखी पडलेल्या वृद्धाचे नाव आहे. याप्रकरणी सहाजणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाम शंकर माशाळे (41), शंकर मलप्पा माशाळे, वैशाली नीलेश माशाळे, नीलेश शंकर माशाळे (सर्वजण रा. हरवाळकर गल्ली, अक्कलकोट) यांच्यासह आणखी दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत बजरंग आप्पासो हरवाळकर यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार यातील फिर्यादी व आरोपी हे नातेवाईक आहेत. त्यांच्यामध्ये शेती व घराच्या मालकी हक्कावरून नेहमी भांडणे व तक्रारी होत होत्या. याचा राग मनात धरून आरोपींनी आप्पासाो हरवाळकर यांच्या घराच्या दारावर तसेच घरावर दगडफेक केली. आप्पासाो हरवाळकर यांना लाथाबुक्क्याने बेदम मारहाण केली. या मारहाणीत ते गंभीर जखमी होऊन मृत झाले. आरोपींनी फिर्यादीच्या आई व पत्नी यांना मारहाण करून गळ्यातील मंगळसूत्र काढून घेतले.याप्रकरणी पोलिसांनी सहाजणांवर खुनाचा गुन्हा नोंद केला असून अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्याचे पोलिस तपास करीत आहेत.

Tags : Solapur, Old, age, murdered, because,  land, matter