Thu, Sep 20, 2018 03:55



होमपेज › Solapur › वर्गणी न दिल्याने तिघांना मारहाण

वर्गणी न दिल्याने तिघांना मारहाण

Published On: Apr 15 2018 11:02PM | Last Updated: Apr 15 2018 9:19PM



सोलापूर : प्रतिनिधी

वर्गणी न दिल्याच्या कारणावरून तिघांना सैफुल चौकात काठीने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे.तिघे जखमी सोलापूर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.

खुतूब इस्माईल शेख (वय 35), चांद इस्माईल शेख (40), हुसेन वजीर शेख (वय 50, तिघे  रा. माळकवठे, दक्षिण सोलापूर) या तिघांस रविवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास सोलापूर-विजापूर महामार्गावरील सैफुल चौकात वर्गणी न दिल्याच्या कारणावरून काठीने व लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. तिघे सोलापूर शहरातील रहिवासी नसल्याने मारहाण केलेल्यांची नावे व ओळखसांगता आली नाही. या मारहाणीमध्ये तिघांना सर्वांगास जबर मार लागला आहे.जखमींना उपचारासाठी रफीक शेख या नातेवाईकाने सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेची नोंद शासकीय रुग्णालयातील पोलिस चौकीत झाली आहे.