होमपेज › Solapur › अहिंसा रॅली, भजनसंध्या कार्यक्रमास प्रतिसाद

अहिंसा रॅली, भजनसंध्या कार्यक्रमास प्रतिसाद

Published On: Jan 05 2018 1:30AM | Last Updated: Jan 04 2018 8:52PM

बुकमार्क करा
सोलापूर : प्रतिनिधी

क्रांतिवीर  मुनीश्री 108  प्रतिकसागर महाराज  यांच्या प्रेरणेने आचार्य श्री 108 पुष्पदंतसागर  महाराज यांच्या 64 व्या  आवतरण दिनानिमित्त  दिगंबर  जैन  जागरण युवा  संघाच्यावतीने काढण्यात आलेल्या अहिंसा रॅली व भजनसंध्या कार्यक्रमास  उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अहिंसा रॅलीमध्ये लालबहादूर प्रशाला, भारतीय जैन संघटना, कामिनी गांधी फॅशन डिझायनिंग इन्स्टिट्यूट, जैन चेतना मंडळ, आचार्य शांतीसागर युवा संघटना, जैन विकास महिला मंडळ आदी संस्थांच्या विद्यार्थी-विद्यार्थिनी व सदस्यांचा समावेश होता.

कामिनी गांधी फॅशन इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थिनींनी गांधी टोपी घातली होती. त्या टोपीवर मुली वाचवा, गोवंश की रक्षा आदी जनजागृतीपर घोषवाक्ये लिहून त्याचे फलकदेखील विद्यार्थिनींनी हातात घेतले होते. ही रॅली जैन गुरूकुल, टिळक चौक, कुबेर गल्ली, जुनी फौजदार चावडी, माणिक चौक या मार्गावरून दिगंबर जैन मंदिरात समाप्त करण्यात आली. या रॅलीतील रथाचे सारथी होण्याचा मान प्रीतम शहा व दीपाली शहा यांना मिळाला.

सायंकाळच्या सत्रात महावीर सांस्कृतिक भवन येथे कुमठे येथील अंध कलाकार अक्षदा शहा यांच्या जैन भजनसंध्येचा कार्य्रक्रम पार पडला. याचे उद्घाटन सुनील गांधी, निर्मलकांत शहा, हर्षवर्धन शहा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रा. धनंजय शहा, प्रदीप शहा, प्रा. मनिष शहा, शिरीष चंकेश्‍वरा, बाहुबली शहा, नम्रता शहा, प्रशांत कोठाडिया, स्नेहा वनकुद्रे, अमिचंद मेहता, नीलेश शहा, अरविंद शहा, डॉ. सुजाता मेहता, मंगेश शहा, महेश नळे, विक्रांत शहा, केतन शहा, शाम पाटील, वालचंद पाटील, चारुकीर्ती शिरसोडे, कामिनी गांधी, सुदर्शन गांधी, बाबू मेहता आदींसह जैन समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता.