Sat, Feb 16, 2019 16:59होमपेज › Solapur › निमगाव येथे व्यवहार सुरळीत

निमगाव येथे व्यवहार सुरळीत

Published On: Jan 04 2018 1:04AM | Last Updated: Jan 03 2018 9:52PM

बुकमार्क करा
निमगांव : वार्ताहर

निमगाव (ता. माळशिरस) महाराष्ट्र बंदचा कोणताही परिणाम दिसून आला नाही. सकाळपासून दूध उत्पादक शेतकर्‍यांनी आपले दूध डेअरीला घातले. गावातील किराणा दुकान, हॉटेल, पंक्चर दुकान, रासायनिक खते, ओषधे यांची दुकाने  छोटे-मोठे व्यवसाय  नेहमीप्रमाणे चालू होते. शाळा, कॉलेज, सरकारी कामकाज  दवाखाने, मेडिकल स्टोअर्स  सुरळीत चालू होते.

गावातून पिलीव, तरंगफळ, गारवाड, चांदापुरी येथे होणारी खासगी व एस.टी.ची वाहतूक सुरळीत चालू होती. संपूर्ण गावात बंद काळात शांतता होती. खबरदारीचा उपाय म्हणून वेळापूर पोलिसांनी गावातून फेरफटका मारला.