Fri, Apr 19, 2019 12:27होमपेज › Solapur › सावरकर यांच्यासारख्या देशभक्‍तीची आवश्यकता : डॉ. येळेगावकर

सावरकर यांच्यासारख्या देशभक्‍तीची आवश्यकता : डॉ. येळेगावकर

Published On: Mar 02 2018 12:49AM | Last Updated: Mar 01 2018 11:26PMसोलापूर : प्रतिनिधी

स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी, अस्पृश्यता निर्मूलनासाठी, विज्ञानाच्या प्रचारासाठी, पोथीमुक्‍त समाजाच्या निर्मितीसाठी आयुष्य वेचले. कर्मकांड, व्रतवैकल्ये, सोवळेओवळे, रोटी बंदी, सिंधू बंदी, शुद्धी बंदी अशा सात बंद्यांना प्रखर विरोध करुन एकजीनसी समाज निर्माण होण्यासाठी प्रयत्न केले. त्यांचे हे विचार अनुयायांनाही पेलले नाहीत. त्यांचे हिंदूत्वाबद्दलचे, हिंदू राष्ट्राबद्दलचे विचार वादग्रस्त असतील, पण त्यांची जाज्वल्य देशभक्‍ती, विज्ञाननिष्ठा, भाषाशुद्धीची चळवळ वादातीत आहे. भारताला महासत्ता होण्यासाठी सावरकरांसारख्या देशभक्‍तीचे आणि विज्ञाननिष्ठेची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन मंगळवेढेकर इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. श्रीकांत येळेगावकर यांनी केले. 

ते स्वा. सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया सोलापूर शाखेच्यावतीने आयोजित दयानंद कला व शास्त्र महाविद्यालयात ‘स्वातंत्र्यवीर सावरकरांचे लोकोत्तर कार्य’ या विषयावर बोलत होते. 

अध्यक्षस्थानी दयानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय उबाळे होते. यावेळी व्यासपीठावर डॉ. डी.आर. गायकवाड, डॉ. सी.व्ही. चनमल, प्रा. एस.एच. कांबळे, एफ.पी.ए.आय. सोलापूर शाखेचे शाखाधिकारी सुगत गायकवाड, वीरेंद्र परदेशी आदी उपस्थित होते.  प्रास्ताविक डॉ. सी.व्ही. चनमल यांनी केले. सूत्रसंचालन सदाशिव गोरे, तर आभार योगिनाथ नागशेट्टी यांनी मानले.