Tue, May 21, 2019 04:40होमपेज › Solapur › नार्वेकरांचा खासगी दौरा; शहरात राजकीय चर्चा 

नार्वेकरांचा खासगी दौरा; शहरात राजकीय चर्चा 

Published On: Feb 02 2018 11:46PM | Last Updated: Feb 02 2018 11:31PMसोलापूर :  प्रतिनिधी 

शिवसेनेच्या सचिवपदाची जबाबदारी सोपविण्यात आलेले तसेच पक्षाचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांचे विश्‍वासू असलेले शिवसेनेतील वजनदार व्यक्‍तिमत्त्व मिलिंद नार्वेकर हे नुकतेच सोलापूर दौर्‍यावर आले होते. ते तुळजापूर येथील तुळजाभवानी दर्शनासाठी आले होते. मात्र त्यांनी जाता जाता संपर्कप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्यामुळे शहरात राजकीय चर्चा रंगली आहे.

नार्वेकर हे देवदर्शनासाठी आले होते. त्यांचा तो खासगी कौटुंबिक दौरा असल्याने त्यांनी शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांना कोणत्याही प्रकारच्या सूचना दिल्या नव्हत्या. त्यामुळे शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांना ते येणार असल्याचेही माहिती नव्हते. मात्र बरडे यांच्या घरी लग्नकार्य असल्याने त्यांनी जाताना सहज भेट घेऊन शुभेच्छा दिल्या असल्याची माहिती शहराध्यक्ष प्रताप चव्हाण यांनी दिली आहे.

त्यामुळे नार्वेकरांचा दौरा राजकीय नसल्याने त्यांना पदाधिकार्‍यांनी भेटणे योग्यच नव्हते, असे चव्हाण यांनी सांगितले असले तरी बरडे हे नार्वेकरांचे विश्‍वासू असून त्यांनी जाताना पक्षाचा ओझरता आढावा घेतला असून यामध्ये शहरात नेमकी काय परिस्थिती आहे याचा कानोसा घेतला असल्याचे समजते.