Sun, Mar 24, 2019 06:40होमपेज › Solapur › वाळवंटातील चेंजिंग रूमसाठी राष्ट्रवादीचा पाठपुरावा

वाळवंटातील चेंजिंग रूमसाठी राष्ट्रवादीचा पाठपुरावा

Published On: Apr 24 2018 1:08AM | Last Updated: Apr 23 2018 8:13PMपंढरपूर : प्रतिनिधी

चंद्रभागेत स्नान करणार्‍या लाखो महिला भाविकांची गैरसोय लक्षात घेऊन राष्ट्रवादी महिला काँग्रेसने वाळवंटात महिलांकरिता चेंजिंग रूमची सोय करावी अशी मागणी केली होती आणि त्यासाठी सातत्याने पाठपुरावासुद्धा केला होता. त्यामुळेच वाळवंटात दोन चेंजिंग रूम उभा राहिल्या आहेत. याबद्दल विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला धन्यवाद देत असल्याचे प्रतिपादन पक्षाचे जिल्हाध्यक्ष माजी आ. दीपक साळुंखे-पाटील यांनी केले. 

चंद्रभागेच्या वाळवंटात नुकतेच मंदिर समितीच्यावतीने दोन ठिकाणी महिला भाविकांसाठी चेंजिंग रूम उभा करण्यात आलेल्या आहेत. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीने पाठपुरावा केल्याचा दावा साळुंखे-पाटील यांनी केला. यासंदर्भात पुढे बोलताना ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा मंदाताई काळे यांनी जिल्हाधिकारी भोसले, मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांच्याकडे पत्रव्यवहार करून, मंदिर समितीच्या बैठकीवेळी सर्वांना भेटून चंद्रभागेच्या वाळवंटात चेंजिंग रूमची मागणी केली होती. त्या मागणीला अनुसरून मंदिर समितीने वाळवंटात दोन ठिकाणी अशा प्रकारची सोय केलेली आहे. त्यामुळे महिला भाविकांची कुचंबणा दूर झाली आहे. या कामासाठी मंदिर समितीला धन्यवाद दिले पाहिजेत अशीही पुस्ती साळुंखे-पाटील यांनी जोडली. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुधीर भोसले यांच्यासह पक्षाचे शहरातील पदाधिकारी उपस्थित होते. 

Tags : Solapur, NCP, follow, up, changing, room,  desert