होमपेज › Solapur ›  इंधन दरवाढीच्या निषेधार्थ पंढरीत राष्ट्रवादी काँग्रेसचा बैलगाडी मोर्चा 

 इंधन दरवाढीच्या निषेधार्थ पंढरीत राष्ट्रवादी काँग्रेसचा बैलगाडी मोर्चा 

Published On: May 29 2018 10:51PM | Last Updated: May 29 2018 10:32PMपंढरपूर : प्रतिनिधी

पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या दराच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज येेथील प्रांत कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्यात आला.शासनाने इंधनाच्या किंमती तातडीने नियंत्रणात आणाव्यात, इंधनाचे दर वाढल्याने जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतींमध्ये मोठया प्रमाणात वाढ होत आहे. ही परिस्थीती तात्काळ नियंत्रणात न आणल्यास राष्ट्रवादी काँग्रेस उग्र आंदोलन छेडेल असा इशारा प्रांतअधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात देण्यात आला आहे.

या मोर्चा  प्रसंगी बोलताना राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य राजूबापू पाटील म्हणाले की, रोज सकाळी झोपेतून उठताच सामान्य जनतेला इंधन दरवाढीचा सामना करावा लागत आहे. गेंडयाच्या कातडीचे हे सरकार मात्र अच्छे दिनाचे कौतुक सांगण्यात व्यस्त आहे. या सरकारचा निषेध म्हणून आज बैलगाडी मोर्चा काढत आहोत मात्र आमच्या सहनशिलतेचा शासनाने अंत पाहू नये. कदाचित उद्या शासनाविरोधात जनताच आसूड घेवून बाहेर पडेल असा इशारा  राजूबापू पाटील यांनी दिला. या वेळी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष युवराज पाटील,  दिपक वाडदेकर, विद्यार्थी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष संकेत ढवळे, किसान सभेचे जिल्हाध्यक्ष मारुती जाधव, डॉ. अमरजीत गोडसे, बाळासाहेब पाटील, औदुंबर गायकवाड, युवराज भोसले यांनी मनोगत व्यक्त केले.

या मोर्चात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत माने, शहराध्यक्ष सुधीर भोसले,  दिगंबर सुडके, हनुमंत पवार, महादेव पाटील, कृष्णात माळी, प्रशांत घोडके, मनोज आदलींगे, अनिल सप्ताळ, अजय जाधव, संदीप गाजरे, सुरज पेंडाल, गुरुराज अभंगराव, महंमद मुलाणी, शंकर शिंदे नाईक, मारुती भिंगारे, सचिन कदम, गुलाब मुलाणी, रशीद शेख, शाहरुक मुलाणी, गिरीष चाकोते, गणेश चव्हाण, संदीप शेंडगे, साधना राऊत, रंजना हजारे, मनिषा राऊत, हेमलता पांढरमीसे यांच्यासह राष्ट्रवादीचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.