Wed, Jan 16, 2019 22:09



होमपेज › Solapur › दादा, १६ मंत्र्यांच्या कोठडीची सोय करा : मुंडे (Video)

दादा, १६ मंत्र्यांच्या कोठडीची सोय करा : मुंडे (Video)

Published On: Apr 06 2018 4:17PM | Last Updated: Apr 06 2018 4:10PM



पंढरपूर : पुढारी ऑनलाईन

ज्या ज्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस जनतेच्या प्रश्नासाठी आंदोलन केले तेव्हा ते दाबण्याचा प्रयत्न केला. सरकार सत्तेचा वापर करून आम्हाला धमकी देण्याचे काम करते. चंद्रकांत दादा यांनी आता स्वतःच्या मंत्रिमंडळातील १६ भ्रष्ट मंत्र्यांच्या कोठडीची सोय करून ठेवावी असे प्रत्युत्तर मुंडे यांनी चंद्रकांत पाटील यांच्या टीकेला दिले. पंढरपूर येथे ते पत्रकारांशी बोलत होते.

मुंबई येथे भाजपच्या महामेळाव्यात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली होती. राष्ट्रवादीचे नेते आमचे  १६ मंत्री भ्रष्ट असल्याचे सांगत आहेत. शिवसेनेवाल्यांना गांडूळ म्हणून बिथरवण्याचा प्रयत्न करत आहेत पण ते भाजपसोबत आहेत. ते बिथरणार नाहीत. राष्ट्रवादी महाष्ट्राला लागलेली वाळवी आहे. या अगोदर लालू जेलमध्ये गेले आता सलमान खानही गेला आहे. छगन भुजबळ ज्या जेलमध्ये आहेत तेथे २-३ कोठड्या रिकाम्या आहेत. त्यामध्ये तुम्हाला जावे लागेल असे चंद्रकांत पाटील आपल्या भाषणात म्हणाले होते.

यावर प्रतिक्रिया देताना मुंडे म्हणाले की, ‘गेल्या चार वर्षांपासून जनतेची फसवणूक करुन मुर्ख बनवणाऱ्या भाजपने आपला स्थापना दिवस १ एप्रिलला साजरा करावा.
भाजप मेळाव्यासाठी २८ रेल्वेंमधून लोक आणून स्वत:चीच फसवणूक करत असल्याचेही मुंडे म्हणाले. शिवसेनेने अजित पवारांना दुतोंडी साप म्हटले त्यावर प्रत्युत्तर देताना मुंडे यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडताना म्हणाले की, ज्या सेनेने सत्तेचा लाभ घेऊन केवळ दिखाव्यासाठी विरोधी भूमिका घेतली या दुटप्पी भुमिकेला गांडुळासारखे दुतोंडी म्हटले तर बिघडले कुठे?

 

Tags : NCP, Dhananjay Munde, BJP, Chandrakan Patil