Tue, Jul 16, 2019 10:18होमपेज › Solapur › ‘आर.आर.आबांनी निर्णय घेतला म्हणून हे शक्य झाले’

‘आर.आर.आबांनी निर्णय घेतला म्हणून हे शक्य झाले’

Published On: Apr 07 2018 11:42AM | Last Updated: Apr 07 2018 11:21AMसोलापूर : पुढारी ऑनलाईन 

भाजप सरकार म्हणते की, भारतात आमची सत्ता आल्यापासून राम राज्य आले आहे. मुली सुरक्षीत आहेत, असे असताना मुलींच्या सुरक्षेच्या मुद्यावर पुन्हा एकदा हादरवून टाकणाऱ्या घटना काल (७ एप्रिल) रोजी मुंबईत घडल्या. याच मुद्यावरून राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी सरकारला धारेवर धरले. ‘राम राज्य आहे? सरकारला लाज वाटते का असं म्हणताना? पोलिस दलात दिसणाऱ्या महिला फक्त आर आर आबांनी निर्णय घेतला म्हणूनच शक्य झाले, अशा शब्दात त्यांनी सरकारला खडे बोल सुनावले. 

‘आपल्या राज्यात जगणे महाग झाले आहे आणि मरणे स्वस्त. या सरकारने गरिबांची साखरही बंद केली आहे. महाराष्ट्रात मुलीचा जन्मदर घटला असून त्यांची संख्या कमी झाली आहे. हे सरकार फक्त महिलांसाठी फसव्या घोषणा करत असून ज्यातून महिलांना काहीच मिळत नसल्याचा आरोपही त्यांनी केला.

Tags : NCP,Chitra Wagh,Maharashtra Government, Hallabol, March, Mohol, Solapur