Fri, Apr 26, 2019 17:40होमपेज › Solapur › नळदुर्ग पालिकेतील राष्ट्रवादीच्या नाराज 6 नगरसेवकांनी स्थापन केला वेगळा गट 

नळदुर्ग पालिकेतील राष्ट्रवादीच्या नाराज 6 नगरसेवकांनी स्थापन केला वेगळा गट 

Published On: Apr 21 2018 1:04AM | Last Updated: Apr 20 2018 10:05PMनळदुर्ग : प्रतिनिधी 

नगरपालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादीच्या 6 नगरसेवकांनी माजी नगराध्यक्ष दत्तात्रय दासकर यांच्या नेतृत्वाखाली वेगळा गट स्थापन केला आहे. त्याचबरोबर उपनगराध्यक्षाच्या रिक्त झालेल्या पदासाठी काँग्रेसच्या 5 नगरसेवकांचा पाठिंबा घेऊन शहर विकासासाठी उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या अंबुबाई दत्तात्रय दासकर यांना पक्षाने उमेदवारी द्यावी अथवा काँग्रेस व राष्ट्रवादीचे मिळून अकरा नगरसेवकांचे उपनगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून दासकर यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. याबाबतची माहिती काँग्रेस व राष्ट्रवादीच्या या 11 नगरसेवकांनी शासकीय विश्रामगृहात गुरूवार रोजी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.   

जिल्हाध्यक्षांना पाठवलेल्या पत्रामध्ये अशोक जगदाळे यांच्या पालिकेतील हस्तक्षेपामुळे सर्व नगरसेवक नाराज असून विकास कामात अडथळे येत आहेत. यामुळे मागील सोळा महिन्यांमध्ये कुठल्याही प्रकारची विकासकामे होऊ शकलेली नाहीत, तसेच जगदाळे यांच्या हस्तक्षेपामुळे गावचा विकास खुंटला आहे. आम्ही राष्ट्रवादीचे नगरसेवक पक्षाशी एकनिष्ठ असून फक्त गट स्थापन करून विकासकामे करून नागरिकांचा असंतोष दूर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. जिल्हा नेतृत्वावर आमचा पूर्ण विश्‍वास आहे. अंबुबाई दासकर यांच्या नेतृत्वावर विश्‍वास दाखवून आम्हास संधी द्यावी.

राष्ट्रवादीच्या या सहा  नगरसेवकांच्या सहीचे पत्र पक्षश्रेष्ठी, जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवण्यात आले आहे. यामुळे नळदुर्ग राष्ट्रवादीचा अंतर्गत वाद विकोपाला गेल्याचे स्पष्ट झाले असून भविष्यात आणखी काही नगरसेवक बंडखोरी करण्याची  शक्यता आहे. असे झाल्यास विधानपरिषदेची तयारी करणारे नेते तथा उद्योजक अशोक जगदाळे यांच्यासाठी धोक्याची घंटा ठरणार आहे.पत्रकार परिषदेमध्ये माजी नगराध्यक्ष दत्तात्रय दासकर, नगरसेवक उदय जगदाळे, सुनील बनसोडे, शहराध्यक्ष महेबुब शेख, राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष बशीर शेख, सिकंदर काझी, काँग्रेसचे गटनेते नय्यर जहागिरदार, नगरसेवक शाहबाज काझी, बसवराज धरणे, विनायक अहंकारी, सामाजिक कार्यकर्ते रणजिसिंग ठाकूर आदी उपस्थित होते. 

Tags : Solapur, NCP, 6, corporators, makes, different, group