Sun, May 26, 2019 21:27होमपेज › Solapur › खून प्रकरणातील आरोपी पती ताब्यात

खून प्रकरणातील आरोपी पती ताब्यात

Published On: Jan 05 2018 1:30AM | Last Updated: Jan 04 2018 9:15PM

बुकमार्क करा
बार्शी :  तालुका प्रतिनिधी 

अनैतिक संबंधास अडसर ठरणार्‍या नवविवाहित पत्नीचा खून केल्याप्रकरणी पतीला पांगरी पोलिसांनी  उस्मानाबाद येथील जिल्हा रूग्णालयातून ताब्यात घेतले आहे. महेश भारत मिसाळ (रा. खामसवाडी, ता. कळंब, जि. उस्मानाबाद) असे खून केल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. 

मनिषा महेश मिसाळ (वय 21, रा. खामसवाडी, ता. कळंब, जि. उस्मानाबाद) या महिलेचा खून केल्याप्रकरणी महेश याच्याविरुध्द पांगरी पोलिसांत गुन्हा खुनाचा दाखल करण्यात आला आहे.  आपल्याला मारहाण झाल्याचा व त्यामध्ये पत्नीचा मृत्यू झाल्याचा बनाव करून पती महेश याने खून केल्याप्रकरणी मनिषा हिच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती महेश मिसाळ याच्याविरुध्द खून करून बनाव केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. खून करून महेश हा उस्मानाबाद येथील जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल झाला होता. परिस्थितीजन्य पुरावे व माहितीमध्ये तफावत जाणवल्याने पोलिसांना पतीनेच पत्नीचा खून केल्याबाबत शंका येत असल्यामुळे पांगरी पोलिस जिल्हा रूग्णालयात महेश मिसाळ याच्यावर नजर ठेऊन होते. अधिक तपास स.पो.नि.धनंजय ढोणे करत आहेत.